मराठवाडा आणि विदर्भात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. तर मध्य महाराष्ट्रात मात्र तापमानाचा वाढलेला दिसला. काल गुरुवारी सकाळपर्यंत्या २४ तासांमध्ये सोलापूर येते उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तर मालेगाव येथील तापमान ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान आजही पूर्व विदर्भात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे. त्यापासून दक्षिण भारतात वाऱ्याचे प्रवाह खंडित झाले आहेत. तर ओडिशातील हवेचा कमी दाबाचा पट्ट आहे. या स्थितीमुळे पूर्व भारत आणि विदर्भात वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील काही भागात उन्हाचा ताप वाढला असून सोलापूर, मालेगावसह पुणे, धुळे, सांगली येथील तापमान ३८ अंशावर आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहेत. अनेक भागात गारपीटही झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बंगालच्या उपसागरामध्ये केंद्रभागी चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पूर्व आणि मध्य भारतामध्ये बाष्पाचा पुरवठा होतो आहे.
Share your comments