अकोला : उद्योगांची क्षमता विचारात घेऊन महिला गटांना सहाय्य करीन औपचारिक दर्जा प्रदान करण्यासाठी पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा महिला गटांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा," असे आवाहन बाळापूर तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी केले.
आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार यांनी गटातील महिलांना मार्गदर्शन करताना
एक जिल्हा एक उत्पादन' या धोरणानुसार डाळ प्रक्रिया उद्योग करीत असतील तर त्यांच्या सहाय्यासाठी या योजनेंतर्गत विचार होणार आहे. शेतकरी जर अन्य उत्पादनांवर प्रक्रिया करीत असतील व त्यांच्याकडे पुरेसे तांत्रिक आर्थिक व उद्यमशील पाठबळ असेल तर सहाय्य करता येणार आहे. नवीन उद्योगांच्या बाबतीत वैयक्तिक डाळ प्रक्रियाधारक, शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या सुरू करीत असतील तर एक जिल्हा एक उत्पादन या धोरणानुसार डाळप्रक्रिया उद्योगासाठीच सहाय्य केले जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
बाळापूर तालुक्यातील मौजे कान्हेरी (गवळी) येथे 'उन्नयन योजने अंतर्गत 7 शेतकरी महिला गटाची सभा घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना पतमर्यादा उपलब्ध करून देणे, उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन अधिक बळकट करणे हा योजनेचा मुळ उद्देश आहे. यामध्ये न अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत ऑनलाइन क अर्ज, प्रकल्प अहवाल, बँकेच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी याबाबत तालुक्यातील शेतकरी, महिला /शेतकरी
गटांना मार्गदर्शन करण्यात येणार. तसेच या योजनेंतर्गत प्रकल्प किमतीच्या ३५ टक्क्यांपर्यंत व जास्तीत जास्त दहा लाख मर्यादित प्रकल्पासाठी अनुदान दिले जाणार आहे. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के व उर्वरित बँक कर्ज राणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Share your comments