यवतमाळ येथे शेतकरी व फवारणी करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिंजेंटाने लाँच केला आय-सेफ कार्यक्रम

07 August 2019 01:28 PM


यवतमाळ:
महाराष्ट्रात शेतीशी निगडित अनेक त्रास समोर आले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ पट्ट्यात प्रत्येक ऋतूत बरेचशे त्रास अनुभवले जातात, त्यामुळे या पट्ट्याला "मल्टी एक्सपोजर" असे म्हटले जाते. या दुष्काळग्रस्त विभागात शेतकऱ्यांना त्यांच्या अनुकूल क्षमतेत सुधारणा करण्यासाठी हातभार लावणे आणि आधार देणे आवश्यक आहे. हि परिस्थिती लक्ष्यात घेता आणि शेतकऱ्यांचे स्वास्थ व सुरक्षेसाठी, सिंजेंटा इंडियाने इनोवेटिव्ह हेल्थ अँड सेफ्टी प्रोग्रॅम म्हणजेच I-SAFE ची तयारी केली आहे.

आय-सेफ हा यवतमाळ मध्ये होणार शेतकऱ्यांसंबंधी पहिलाच कार्यक्रम आहे, जो शेतकऱ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी आणि सुरक्षेविषयी जागृत व शिक्षित करेल, सिंजेंटा इंडिया ने आय-सेफ (I-SAFE) नामांकित या कार्यक्रमाची सुरुवात  केली. या कार्यक्रमाचे उद्देश्य 10,000 शेतकऱ्यांना व फवारणी करणाऱ्यांना सक्षम बनवणे आहे,  जेणेकरून त्यांना किटनाशक आणि त्याची फवारणी कशी करावी या विषयी माहिती देणारा आहे. हे त्यांना स्प्रेमॅन उद्योजक होण्यास लाभदायक ठरेल. या कार्यक्रमाची घोषणा सिंजेंटा इंडियाच्या आयोजित एका समारोह सोहळ्यात केल्या गेली. कृषी विभाग आणि यवतमाळ जिल्हा प्रशासनच्या सहयोगाने महाराष्ट्र कृषी दिवस 2019 ला कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले, तर या सोहळ्यात 150 शेतकरी व फवारणी करणारे उपस्थित होते.

आय-सेफ हे सिंजेंटा सीआरएफ द्वारे घेतलेला पुढाकार आहे, सिंजेंटा फाऊंडेशन इंडिया च्या सहयोगाने तर, शेती विभाग च्या मार्गदर्शनात पार पडला जात आहे. या प्रकल्पाचे लक्ष 100 तरुणांना स्प्रेमॅनचे प्रशिक्षण देणे आहे, जे समोर जाऊन 500 तरुणांना स्प्रेमॅन चे प्रशिक्षण देईल. सिंजेंटा हि सरकार च्या सहकाऱ्याने शेतकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी यवतमाळ आणि सातारा जिल्हा येथे कार्यक्रमवार काम सुरु केले आहे.

श्री. जलज शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ) यांनी सिंजेंटाच्या 'स्प्रेमॅन उद्योजक' संकल्पनेची प्रशंसा केली आणि म्हणाले, हि संकल्पना यवतमाळ येथील ग्रामीण युवकांसाठी रोजगार संधी आणतील, सोबतच कृषी कार्यात हि प्रगती होईल, कारण कृषी रसायनाचा दुरुपयोग टळेल व यासंबंधी सुरक्षेत सुधार होईल. जलज शर्मा यांनी स्प्रेमॅन प्रशिक्षणाच्या महत्व याविषयी भाष्य करताना सांगितलं कि स्प्रेमन प्रशिक्षण का महत्वाचे आहे. या कार्यक्रमाला श्री. नवनात कोपलकर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ) आणि श्री. पंकज बर्डे (कृषी विकास अधिकारी) यांचीही उपस्थिती होती.    

सिंजेंटा चे चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर, डॉ. के. सी. रवी म्हणाले की "2017 रोजी यवतमाळ इथे चुकीचं मिश्रण आणि निर्णय घेतल्याने, फवारणी बाबत पाहिजे तशी सुरक्षा घेण्यात आली नाही. कंपनीच्या ऑपरेटरद्वारे सामाजिक दायित्व च्या अंतर्गत केलेला हा प्रयत्न, व्यवसायिक फवारणीकरांना जन्माला घालेल, जे फवारणी दरम्यान पूर्ण सुरक्षा बाळगतील" ते म्हणाले महाराष्ट्र कृषी विभाग यांनी यवतमाळ जिल्हा प्रशासन आणि सरकारी संगठनेंच सहकार्य लाभणं हि आमच्यासाठी फार कौतुकाची गोष्ट आहे, याप्रकारे आम्ही हे सुनिश्चित करू शकू कि कृषी कार्य आता सुरक्षितपणे पार पाडली जात आहेत जेणेकरून कोणत्याही नको त्या घटना समोर घडणार नाहीत.

डॉ. के. सी. राव म्हणाले " यवतमाळ जिल्ह्यात आम्ही 2017-2018 पासून शेतकरी प्रशिक्षण, वैयक्तिक स्वास्थ, स्वच्छता आणि सुरक्षेवर मोहिम, डॉक्टर प्रशिक्षण कार्यक्रम आणि सिंजेंटा वोक्हार्ट मोबाईल हेल्थ क्लिनिकचे संचालन करत आहोत. आता यवतमाळ जिल्ह्यात आय-सेफ कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी आमचे कार्य आणि गतीविधी आणखी मजबूत करेल.

आय-सेफ कार्यक्रम लाँचच्या वेळेस जिल्हा परिषदेची अध्यक्ष सौ. माधुरी ताई, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी विषय समिती, यवतमाळचे अध्यक्ष श्री. श्याम जैस्वाल यांनी सिंजेंटाद्वारे प्रशिक्षित शेतकऱ्यांना स्प्रे पंप आणि सुरक्षा उपकरण दिले, सौ. माधुरी ताई यांनी सिंजेंटा वोक्हार्ट मोबाईल हेल्थ क्लिनिकला झेंडा दाखवून रवाना केले आणि स्थानिय कृषी विज्ञान केंद्रद्वारे संचालित फवारणी प्रशिक्षण उत्तीर्ण करण्याऱ्या स्प्रेमॅन यांना प्रमाणपत्र दिले. इथे प्रशिक्षणात हिस्सा घेतलेल्या लोकांनी देखील आपला अनुभव सांगितला, त्यांनी सेफ्टी गियर चा अनुभव व्यक्त केला, हे बरोबर का वापरावा याचा महत्व सांगितले आणि विभिन्न रसायनाच्या मिश्रणाचा काय फरक पडतो हे देखील त्यांनी इथे सांगितले.

किटकनाशक फवारणी हि कृषी मधील एक महत्वाची गतविधी आहे, म्हणूनच फवारणी करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना याबाबत बरोबर व्यावसायिक माहिती असणं गरजेचं आहे, ज्यात या काही गोष्टींचा समावेश आहे. बरोबर साठवणूक, वापर, कृषी रसायन कंटेनर व संबंधित जबाबदारी. या प्रशिक्षित स्प्रेमॅनला कृषी उद्योगच्या दिशेत सामोरी जाण्यासाठी सिंजेंटाचे प्रमाणन हे आवश्यक केले आहे. सिंजेंटा फाऊंडेशन इंडिया हे आप प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, नांदेड येथे संचालन करीत आहे, जे फवारणी करणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना प्रमाणित करेल. या प्रक्रियेमुळे त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल आणि हे शेतकरी व फवारणी करणाऱ्यांसाठी गुणवत्तेचं देखील ठरेल. या प्रगतीशील विचारांनी शेतकऱ्यांना लाभी ठरेल, कारण ते निश्चिंत राहतील कि फवारणी करणाऱ्यांना किटकनाशके वापरण्याची पद्धत आणि किड व्यवस्थापन याविषयी सगळी माहिती असेल जी कि महत्वपूर्ण आहे.

या कार्यक्रमात सिंजेंटा टीमने एक सत्र संचालित केले होते जे कि किटकनाशके वापरण्याचे तंत्र यावर होते. या कार्यक्रमाचा समारोप प्रात्यक्षिकद्वारे झाली ज्यात फवारणी उपकरणांविषयी माहिती दिली व उपकरण सुरक्षितरित्या कसे वापरावे हे सांगितले. 

I-SAFE Syngenta सिंजेंटा vidarbha विदर्भ आय-सेफ यवतमाळ yavatmal
English Summary: Syngenta Launches I Safe Programme for Training to Farmers & Sparyamans in Yavatmal District

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.