कोरोनामुळे देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांचे काम थांबू नये, यासाठी सरकारकडून अनेक निर्णय घेतले जात आहेत. त्या निर्णयातून शेतकऱ्यांना सहकार्य करुन त्यांच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर केली जात आहेत. शेतकऱ्यांसाठी सरकारने किसान ऐप आणि ई-नाम सारखे पोर्टल लॉन्च केले. जेणेकरून शेतकऱ्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या शेतमालाची विक्री किंवा खरेदी करता येईल. इतकेच नाही बाजारभावाची माहितीही सरकारकडून दिली जात आहे. कोरोनासारख्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारबरोबर आता खासगी कंपन्यांही उभ्या राहिल्या आहेत.
अशीच एक कंपनी आहे, त्यांनी बळीराजाच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. ही कंपनी आहे सिंजेंटा इंडिया (Syngenta India ). आता खरीप हंगामात शेतकऱ्यांना काही समस्या उद्भवू नये. किंवा काही अडचणी आल्यास त्याचे निराकरण व्हावे यासाठी Syngenta India कंपनीने ही हेल्फलाईन सुरू केली आहे. 1800-1-215-315 हा हेल्पलाईनचा नंबर आहे. यावर संपर्क करुन शेतकरी पिकांविषयी सल्ला, शेतीविषयीच्या सुचना आणि इतर माहिती जाणून घेऊ शकतील.
तज्ञ आणि विशेषतज्ञ करतील आपल्या समस्येचे निराकरण
Syngenta कंपनीतील तज्ञ आपल्या समस्या सोडवतील. शेती संबंधित मार्गदर्शन, आणि शेतीपुढील असलेले आव्हानांची माहिती आणि त्या आव्हानांना कसे पार करायचे याची माहिती हे तज्ञ देतील. विशेष म्हणजे हे तज्ञ कोणत्याही भाषेत आपली समस्या सोडवतील. ही हेल्पलाईन ९ भाषांमध्ये सेवा देते. Syngenta किसान हेल्पलाईन सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान आपली समस्या ऐकेल आणि त्यांचे निराकरण करेल. सोमवार ते शनिवार या दिवशी दिलेल्या वेळेत कॉल केल्यास तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर आणि कृषीविषयीचा सल्ला मिळेल. हिंदी, पंजाबी, मराठी, गुजराती, तेलगू, तामिळ, कन्नड, ओडिया आणि बंगाली अशा नऊ वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला उत्तर मिळेल, यासाठी एकूण १६ चॅनेल्स तयार करण्यात आली आहेत.
शेतकरी आता खरीप हंगामासाठी पेरणी करणार आहे. त्यामुळे यावेळी त्यांना योग्य सल्ला मिळणे आवश्यक असते. शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आम्ही एक व्यासपीठ या हेल्पलाईनद्वारे मिळवून देत आहेत. लॉकडाऊन काळात आणि त्यापलीकडे असलेल्या अनेक गंभीर प्रश्नांवर लक्ष देण्यास तसेच महत्त्वपूर्ण माहिती देण्यास हेल्पलाईन मदत करेल, 'असे सिंजेंटा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राफेल डेल रिओ यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना सोशल डिस्टंन्सिग, पीपीई आणि कोविड-१९ संबंधी इतर सावधनगिरी कशी बाळगावी याची माहिती शेतकऱ्यांना हे कॉल सेंटर देईल. सामान्यत: शेतकर्यांना अंदाजे हवामान, कीटकांचा प्रादुर्भाव, वनस्पतींचे रोग किंवा बाजारातील परिस्थिती बदलणे या बाबींचा सामना करावा लागतो. प्रसंगी कोरोनासाऱख्या साथीच्या आजारांवेळी विश्वासार्ह माहिती आवश्यक असते. यामुळे आम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त करतो की, शेतकऱ्यांना त्याच्या शेती आणि शेतीविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही हे माध्यम उपलब्ध करुन देत असल्याचे Syngenta कंपनीचे मुख्य अधिकारी केसी रवी म्हणाले.
Share your comments