चिखली-
स्वाभिमानीच्या वेळोवेळी आंदोलनात्मक भुमिकेनंतर शासनाकडुन जिल्ह्यासाठी पिक विमा मंजुर करण्यात आला परंतु हजारोच्या खात्यावर रक्कम जमा झाली परंतु यामध्ये सुद्धा विमा कंपनीने हुशारी करत अनेकांच्या खात्यावर कमी रक्कम देणे,काहिंच्या खात्यावर अजुनही रक्कम दिली नाही,नदिकाठच्या शेतकर्याचे मोठे नुकसान झाले असतांना तोकडी मदत देणे या व इतर मागण्यांची दखल न घेतल्याने दि13जानेवारी पासुन स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्यासह सतिष सुरडकर,प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे,आशु जमदार यांच्यासह आदिंनी चिखली कृषी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.तर वेळोवेळी केलेल्या मागण्यांकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत असुन विमा कंपनीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते शेतकरी यांनी केला आहे.
पिक विमा कंपनीस पाठीशी घातले जात असल्याचा आंदोलकर्ते यांचा आरोप तर रात्रीच्या थंडीतही शेतकरी कृषी विभागाच्या मैदानातच.तालुक्यातील शेतकर्याचे अतिवृष्टि मुसळधार पावसामुळे नदिकाठच्या शेतजमीनी पिकासह पुराच्या पाण्याने खरडुन गेल्या होत्या शेतात पाणीच पाणी साचल्याने तालुक्यातील उडीद,मुंग,तुर त्याचप्रमाणे सततधार पावसामुळे उभ्या सोयाबीन पिकास कोंब फुटल्याने अतोनात नुकसान झाले होते.याचे संयुक्त पंचनामे सुद्धा कृषी सहाय्यक,विमा प्रतिनिधी यांच्याकडुन करण्यात आले होते.यामधे 80ते90टक्के नुकसान असल्याचा कृषी अहवाल देखील तयार करण्यात आला होता.हिच बाब हेरुण शेतकर्यासह स्वाभिमानीने पिक विमा प्रश्नावर आक्रमक भुमीका घेतल्याने पीक विमा योजना खरीप 2020-21अंतर्गत काढणी पश्चात व हंगामातील प्रतिकुल परीस्थीती यामुळे
नुकसान झालेल्यांसाठी शासनाकडुन पिक विमा मंजुर करण्यात आला होता हजारो शेतकर्याच्या खात्यावर विमा रक्कम मिळाली परंतु आजही चिखली तालुक्यातील अनेक शेतकरी विम्या पासुन वंचीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा पिक विमा कंपनी विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असुन उर्वरीत शेतकर्याची पिक विमा रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी,ज्या शेतकर्याना पिक विमा कमी दिला त्यांची उर्वरीत रक्कम जमा करण्यात यावी,नदिकाठच्या शेतकर्याचे अतोनात नुकसान झाले असतांना कमी रक्कम खात्यावर जमा केल्या प्रकरणी चौकशी करुण उर्वरीत रक्कम अदा करण्यात यावी, अकाउंट नंबर,व इतर त्रृटिमुळे अडकुन पडलेली रक्कम अदा करावी,दोन पिकाचा विमा काढला असतांना तुरीचाच विमा दिल्याची चौकशी करुण उडीद,मुंग,सोयाबीन पिकाचा विमा अदा करावा,पिक विमा संदर्भातील संपुर्ण तक्रारीचा निपटारा तात्काळ करण्यात यावा,यादीमधे पैसे पेड परंतु प्रत्यक्षात पैसे प्राप्त नसलेल्यांचे पैसे अदा करा,शेतकरी छळवणुक करीत फसवणुक केल्या प्रकरणी विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात यावे,खरीप पिक विमा 2020-21ची भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यात यावी,रीलायन्स जनरल इन्सुरन्स कंपनीस काळ्या यादित टाकण्यात यावे,यासह आदि मागण्यांसाठी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांच्यासह सतिष सुरडकर,
प्रल्हाद देव्हडे, रामेश्वर चिकणे,आशु जमदार यांच्यासह आदिंनी चिखली कृषी कार्यालयासमोर कडाक्याच्या थंडीत बेमुदत ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे.तर अनेक शेतकरी बांधवांनी आंदोलनास पाठींबा दर्शवत तक्रारी सादर केल्या आहेत.तर ऐन वेळेवर कोविड निर्देश धडकले असल्याने नियमांचे पालन करीत आंदोलन सुरु आहे तर रात्रीच्या कडाक्याच्या थंंडीतही शेतकरी आंदोलन मंडपातच झोपुन आहेत.तर न्याय मिळे पर्यत कृषी विभागाचे मैदान सोडणार नसल्याची भुमीका विनायक सरनाईक यांच्यासह आंदोलकर्ते यांनी घेतली आहे.
Share your comments