चिखली:- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली आहे. आज,१९ नोव्हेंबर रोजी तिसरा दिवस या अन्नत्यागास उजाडला आहे. टप्प्याटप्प्याने करण्यात येणाऱ्या आजच्या रास्तारोको आंदोलनात आज हजारो शेतकरी सकाळपासून रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले.दरम्याण तालुक्यातील सोमठाणा फाटा येथे शेतकरी बैलगाड्या घेवुन रस्त्यावर उतरले होते तर स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,भारत वाघमारे यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन दि19नोव्हें रोजी करण्यात आले आहे.सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी १७ नोव्हेंबर च्या सकाळपासुन नागपुरातील संविधान चौकात अन्नत्याग स्त्याग्रहाला सुरुवात केली होती.
आंदोलन दडपण्यासाठी नागपूर पोलिसांनी रात्रीच तुपकरांना अटक करून काल,१८ नोव्हेंबर रोजी सकाळी बुलडाण्यात आणुन सोडले होते.मात्र बुलडाण्यात आल्यानंतरही तुपकरांनी निवासस्थानाबाहेरच अन्नत्याग सत्याग्रह सुरूच ठेवला.तीन दिवसांपासून उपाशीच असल्याने आज,१९ नोव्हेबर रोजी सकाळपासून तुपकर यांची तब्येत प्रचंड बिघडली आहे.प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्याभरातील शेतकरी प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. आज ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजेपासून पूर्वनियोजित ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन करण्यात आले.बुलडाणा-खामगाव मार्गावरील वरवंड फाट्यावर शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेनऊ वाजता हजारो शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.जवळपास दोन तास या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.
अखेर साडेअकरा वाजेच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने वाहतुक पुर्ववत झाली.बुलडाणा चिखली मार्गावरील येळगाव,चिखली- खामगाव रोडवरील सोमठाणा फाटा व पेठ फाटा येथे विनायक सरनाईक,भारत वाघमारे व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.दरम्याण सोमठाणा फाटा येथे शेतकरी बैलगाड्या घेवुन रस्त्यावर उतरले होते.यावेळी शेतकर्याच्या सोयाबीनला 8हजार स्थीर भाव देण्यात यावा,मागील वर्षीचा व यावर्षी पिक विमा विना अट देण्यात यावा,नदिकाठच्या नुकसानग्रस्त शेतकरी यांना नियम अटि न लावत नुकसान भरपाई देण्यात यावी,जळालेले रोहित्र तातडीने बदलुन देण्यात यावे,महावितरण सुरु केलेली सक्तीची विजबिल वसुली थांबवावी,पिक विमा कंपनांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे,यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी शेतकर्यानी शासना विरोधात घोषणाबाजी देखील केली तर तुपकरांच्या मागण्यांची दखल घेऊन अन्नत्याग आंदोलना पासुन परावृत्त करावे अशी मागणी स्वाभिमानी चे विनायक सरनाईक यांनी केली
असुन अन्यथा यापेक्षा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलन कर्ते यांनी दिला आहे.यावेळी विनायक सरनाईक, भारत वाघमारे,अमोल मोरे,रविराज टाले, अविनाश झगरे,छोटु झगरे,औचितराव वाघमारे,राम आंभोरे,सुदर्शन वाघमारे,कार्तिक खेडेकर,शुभम डुकरे,रमेश पवार,नवलसिंग मोरे,सरदारसिंग इंगळे,विठ्ठल वसु यांच्यासह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
Share your comments