संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या पुढाकाराने स्वाभिमानी शेतकरी पॅनलने १३ उमेदवारांनी अर्ज दाखल करीत त्यांना निवडणूकीच्या मैदानात उतरविले होते. त्याच ताकतीने तेवढ्याच जोशात विरोधी पॅनलने १७ उमेदवारांचे अर्ज दाखल करीत नियोजित पुर्व तयारी सुरू केली पंरतु १७ उमेदवारांनी चुकिचे अर्ज दाखल
केले असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते अर्ज रद्द केले. त्यामुळे विरोधी पॅनलचे सर्वच उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्या बोडखा ग्रामसेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नव्यानेच एन्ट्री करत १३ हि जागेवर विजय प्राप्त करता आला. यामधे स्वाभिमानीचे निवडुन आलेले सोसायटी संचालक सर्वसाधारण
खातेदार कर्जदार मतादार संघातुन श्रीकृष्ण मधुकर सोळे, मनोज निलकंठराव देशमुख, नारायण जाणुजी उमाळे, संदीप रमेश देशमुख, वसंत साहेबराव ठाकरे, स्वप्नील वामनराव अवचार, सुभाष विश्वासराव अवचार, जनार्धन जयराम परमाळे,ओ बी सी मतदार संघातून गणेश शेषराव ठाकरे, महिला राखीव मतदार संघातुन सौ. राजकन्या गजानन लिप्ते,
निकीता संजय सौदागर, विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातुन बळीराम जयराम परमाळे, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून जयराम मारोती उमाळे या सर्व निवडुन आलेल्या सोसायटी संचालकांना कोणताही राजकीय वारसा नसतांना सामान्य शेतकरी आहेत. त्यामुळे यांचेवर शेतकरी वर्गातुन प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Share your comments