सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांविषयी काढलेल्या उद्गारांमुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी थेट जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी केली, यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीनंतर जयंत पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यामुळे आता वातावरण तापले आहे.
दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणावर चर्चा करताना झालेल्या गोंधळामुळे ६ वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांकडून आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची विनंती करण्यात आली.
कोरोना पुन्हा वाढला! केंद्रीय मंत्र्यांचे मास्क सक्तीबाबत मोठे वक्तव्य
ही मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यावरून विरोधकांनी आरडा-ओरडा करायला सुरुवात केली. त्यानंतर जयंत पाटलांना बोलण्याची संधी देण्याची मागणी केली गेली. अजानक जयंत पाटील यांनी उठून हा शुद्ध निर्लज्जपणा आहे, असा शब्द वापरला.
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
त्यानंतर सभागृहात सर्वच सत्ताधारी पक्षांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याची मागणी केली. त्यानंतर जयंत पाटील यांचे अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यता आले आहेत. त्यांना या काळात मुंबई आणि नागपूर विधिमंडळ आवारात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो सौर शेतीत मोठी संधी, केंद्र सरकारचे २५ हजार मेगावॉट सौरऊर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट
शेतकरी नेते राजू शेट्टी यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार, विमान प्रवासात घडला धक्कादायक प्रकार
जनावरांचा बाजार शुक्रवारपासून सुरू, शेतकरी व्यापाऱ्यांना दिलासा..
Share your comments