1. बातम्या

सुपर संडे : महत्वाच्या कृषी बातम्या

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. यावर शिंदे फडणवीस सरकारने नुकसानभरपाईची घोषणा केली मात्र तरीही राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. नुकसानीची माहिती देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत.

agricultural news

agricultural news

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं जाहीर केली हेल्पलाईन, शेतकऱ्यांना होणार फायदा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. यावर शिंदे फडणवीस सरकारने नुकसानभरपाईची घोषणा केली मात्र तरीही राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांना या नुकसानभरपाईचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे. नुकसानीची माहिती देण्यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केले आहेत. या दिलेल्या क्रमांकावर 9922204367 आणि 02222876342 शेतकऱ्यांना त्यांचं झालेलं नुकसान आणि फोटो पाठवायचा आहे. अशातच पुढील तीन दिवस राज्यात अशीच परिस्थिती राहिली, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र या संकटातून ही Kisan Helpline नक्कीच शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकते. त्यापूर्वी शेतकऱ्यांना या दिलेल्या नंबर वर 9922204367 आणि 02222876342 संपर्क करावा लागेल.

अखेर शेतकऱ्यांचा लाँग मार्च स्थगित, शेतकरी नेते जीवा पांडू गावित यांची माहिती

२. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांच आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली.
राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमचा लाँग मार्च मागे घेत आहोत, असं जीवा पांडू गावित यांनी स्पष्ट केलं.
जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला मागण्या मान्य झाल्याच्या सरकारच्या निवदेनाची प्रत दिली. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं सांगत त्यांनी जिल्हाधीकारी आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. शिवाय या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अवकाळीने शेतकऱ्यांना मिळतेय 'सजा' मात्र बांधावर न जाता कृषिमंत्र्यांची मजा चालली असल्याचा विरोधकांकडून आरोप

३. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीच्या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बराच वाद निर्माण झाला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं वक्तव्य केलं होत. असं असलं तरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता बीडमध्ये मिलेट दौडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे कृषी मंत्र्यांची मजा चालली असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. एककीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं असताना कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याऐवजी मिलेट दौड मध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.

१९ मार्च. आज किसानपूत्र आंदोलनाच्या वतीनं महाराष्ट्रभर उपवास केला जातो, अमर हबीब यांची माहिती

४. आज 19 मार्च. आज किसानपूत्र आंदोलनाच्या वतीनं महाराष्ट्रभर उपवास केला जातो. शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी हा उपवास केला जातो. 19 मार्च 1986 रोजी शेतकरी साहेबराव करपे कुटुंबीयांनी आत्महत्या केली होती. करपे कुटंब हे चिलगव्हाण येथील होते. त्यामुळेच या गावात आज सुतक पाळले जाणार असून सामूहिक उपोषण देखील केले जाणार आहे. याबाबतची माहिती अमर हबीब यांनी दिली. साहेबराव करपे नावाचा शंभर एकर जमिनीचा मालक असलेला शेतकरी आपली पत्नी आणि 4 गोड लेकरांना घेऊन मरणप्रवासाला जातो. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून शेवटी ते या जगाचा निरोप घेतात. आज या घटनेला 37 वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून सुरू झालेल आत्महत्यांच सत्र आजही राज्यात थांबलेल नाहीये.

किसान लाँग मार्चच्या शेतकरी मागण्यांच्या समितीतून शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना वगळलं

५. आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेने लाँग मार्च काढला होता यात प्रकरणात आता राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमण्यात आली आहे. या समितीत संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी असावेत अशी मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोब झालेल्या बैठकीत केली होती. या समितीत डॉ. अजित नवले यांचाही समावेश असावा असंही सांगण्यात आले होते मात्र, अजित नवले यांचा या समितीत समावेश करण्यात आला नाही. मात्र यावर डॉ. अजित नवले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, तुम्ही मला समितीतून काढू शकता मात्र शेतकऱ्यांच्या हृदयातून नाही. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रपुरात मिर्ची उत्पादकांना 'अच्छे दिन'

बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मिळाला विक्रमी भाव

६. आता बातमी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी.
चंद्रपुरात मिर्चीला बाजारपेठ उपलब्ध झाल्याने या ठिकाणी देशभरातून व्यापारी आले आहेत. कारण चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षी पासून बाजार समितीत मिर्चीचे सौदे भरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देशभरातील व्यापारी हे चंद्रपूर मध्ये मिरची खरेदीसाठी येत आहेत. यातून शेतकऱ्यांना देखील विक्रमी भाव मिळत आहे. पहिल्याच वर्षी व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे बाजारसमितीचाही उत्साह वाढला आहे. त्यामुळे लवकरच मिर्चीच्या सौद्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचा बाजार समितीचा विचार आहे. ज्यामुळे येत्या काही वर्षात चंद्रपूर देशातील मिर्ची ची प्रमुख बाजारपेठ म्हणून उदयाला येऊ शकेल.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार आज शेतकऱ्यांच्या बांधावर अवकाळीच्या नुकसानीची केली पाहणी

७. मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. त्यामुळे यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, परिस्थितीची माहिती जाणून घेतली. तसेच अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे लवकरच या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

पुढील तीन दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता

८. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं टेन्शन अधिकच वाढवलं आहे. या पावसामुळ शेतातील उभ्या भात, गहू, चना यासह पालेभाज्यांची शेती धोक्यात आली आहे. शिवाय या अवकाळी पावसामुळं शेतातील गव्हाचे पीक आडवे झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा मोठा फटका मुदखेड आणि अर्धापूर तालुक्याला बसला आहे. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगराबंदी रामराववाडी पींपळशेंडा या भागात अवकाळी पावसा सह वादळी वाऱ्याने आणि गारपीटी ने चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. तर काही भागात गारपिटीचीही शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहान हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

English Summary: Super Sunday : Important agricultural news Published on: 19 March 2023, 01:08 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters