मुंबईत क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी ३३ वर्षांपूर्वी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र शासनाने दिलेला सरकारी भूखंड त्यांनी शासनाला परत केला आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गेल्या वर्षी वांद्रे उपनगरातील गावस्कर यांना दिलेल्या भूखंडाचा वापर न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या भूखंडावर क्रिकेट अकादमी स्थापन होणार होती, मात्र तीन दशकांनंतरही ते होऊ शकले नाही.
राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गावस्कर यांनी हा भूखंड महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) परत केला आहे. वांद्रे येथे ३३ वर्षापूर्वी दिलेल्या भूखंडावर क्रिकेट अकादमी उभारता आली नसल्याची माहिती गावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिली होती असेही आव्हाड यांनी सांगितले.
यापूर्वी गावस्कर यांनी सचिन तेंडुलकरसह अकादमी स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता, परंतु त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. म्हाडाने गावस्कर यांना भूखंड परत करण्याची विनंती केली होती.
सुनील गावसकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील महान फलंदाजांमध्ये गणले जातात. सुनील गावसकर यांनी भारतासाठी १२५ कसोटी सामने खेळले असून ५१ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या आहेत. सुनील गावसकर यांच्या नावावर ३४ कसोटी शतके आहेत, जो प्रदीर्घ काळासाठीचा विक्रम होता.
सुनील गावस्कर यांनी १०८ एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. सुनील गावस्कर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३५.13 च्या सरासरीने ३०९२ धावा केल्या आहेत. सुनील गावसकर यांच्याकडे वनडे क्रिकेटमध्ये फक्त एकच शतक आहे.
महत्वाच्या बातम्या
Health diet: घोळ माशाचे सेवन केल्याने होतात शरीराला हे '7' आरोग्यदायी फायदे
मत्स्यपालन करायची योजना आहे? तर मत्स्यसंवर्धन हे महत्त्वाचे त्यामुळे या पद्धतीने करा पूर्वतयारी
Share your comments