गेल्या महिन्यात अखेरीस काळात मराठवाडा तसेच अनेक भागात तापमानाचा पारा हा १० अंशाखाली आलेला होता त्यामुळे थंडी जास्त पसरलेली होती. १० अंशाखाली पारा आल्याने सर्वत्र थंडीचे वातावरण झाले होते. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मराठवाड्यात किमान व कमाल तापमानात २ - ३ अंशाने वाढ होणार असल्याने आता उन्हाळ्याची झळ सोसावी लागणार आहे असे परभणी मध्ये असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने व्यक्त केले आहे. यावर्षी चा उन्हाळा जास्त च तापमानात जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे असेही सांगण्यात आले आहे.
पिकाला पाण्याची गरज भासणार :-
मोसम सेवा केंद्राने जो अंदाज लावला आहे त्या अंदाजानुसार मराठवड्यात पुढील तीन दिवसामध्ये किमान तापमान आणि कमाल तापमानात २-३ अंशाने वाढ होणार असल्याची दाट शक्यता त्यांनी वर्तविली आहे. तसेच चौथ्या व पाचव्या दिवशी किमान तापमान व कमाल तापमानात घट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सॅक तसेच इस्रो या संस्थानी दिलेल्या माहितीनुसार बाष्पोत्सर्जनाचा वेग आता वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतील पूर्ण ओलाव्याचे बाष्पीभवन झाले आहे जे की ओलावा कमी झाल्यामुळे पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे लागणार आहे असे सांगण्यात आले आहे.
हा आठवडा थंडीचा :-
पुढील तीन दिवसामध्ये मराठवड्यात थंडी नसणार आहे तरी सुद्धा विस्तारीत अंदाजानुसार मराठवड्यात १६ ते २२ फेब्रुवारी च्या कालावधीत कमाल तापमान हे मध्यम प्रमाणत तर सरासरीपेक्षा कमी आणि सरासरीपेक्षा किमान तापमान कमी राहील अशी शक्यता ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राने दिली आहे. त्यामुळे पुढील दिवसात मराठवाड्यात कमी थंडी तसेच कमी गरमी असा वातावरणाचा सामना करावा लागणार आहे.
पुढील तीन दिवसामध्ये तापमानात २-३ अंशानी वाढ होणार असल्याने थंडीमध्ये प्रमाण कमी होणार आहे जे की किमान तापमानात आणि कमाल तापमानात वाढ होणार आहे मात्र तिथून पुढे म्हणजेच १६ ते २२ फेब्रुवारी दरम्यान पुन्हा थंडी वाढणार आहे अशी शक्यता हवामान अंदाजाने लावली आहे. वातावरणात होणाऱ्या सतत बदलामुळे सर्दी तसेच खोकला या सारख्या आजारांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पुढील दिवसात काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
Share your comments