1. बातम्या

उन्हाळी कांदा चालला लंडनला; भारतीय कांद्याला व्यापाऱ्यांची पसंती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
उन्हाळी कांद्याचे परदेश वारी

उन्हाळी कांद्याचे परदेश वारी

नाशिकचा उन्हाळी कांदा आता थेट लंडनला निघाला आहे. भारतीय बाजारपेठेत उन्हाळी कांद्याचे दर हे क्विंटलला सरासरी 800 ते 1151 पर्यंत खाली गेल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत निर्यातीच्या भावात निम्म्याने घसरण झाली आहे.

दक्षिण भारतातून कांद्याची आवक वाढून तसेच पश्‍चिम बंगालमधील कांद्याची आवक अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. गुजरातच्या कांद्याचा विचार केला तर तो जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत मध्ये संपेल. अशावेळी मध्यप्रदेशातील कांद्याची आवक सुरू झाली असून हा कांदा नाशिकच्या कांद्याची टक्कर देणार आहे. सद्यस्थिती कांद्याच्या निर्यातीचा भावाचा विचार केला तर प्रति टन 250 ते 350 डॉलर इतका सरासरी भाव मिळत आहे. भारतीय कांद्याची मागणी ही विशेषता हॉलंड आणि चीन मधून वाढली आहे.

 

अगोदरच्या विचार केला तर लंडनचे व्यापारी हॉलंड मधून भारतातील कांदा विकत घ्यायचे. परंतु सद्यस्थितीत लंडनचे व्यापाऱ्यांनी नाशिकहुन उन्हाळी कांद्याची मागणी सुरू केली आहे. लंडन चा विचार केला तर प्रति टन 380 पौंड इतका कांद्याला भाव मिळत आहे. त्यामध्ये कारण असे की नाशिक जिल्ह्यात आता द्राक्षांचा हंगाम सुरू असल्याने असल्याने युरोपियन देशांमध्ये द्राक्षे पाठवण्यासाठी कंटेनरची मागणी वाढल्याने एका महिन्यात कांदा साठी लागणाऱ्या कंटेनर चे भाडे $3000 वरून पाच हजार डॉलर पर्यंत पोहोचले आहे. 

कंटेनरची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढवून भाडे कमी होताच लंडनच्या लोकांना कमी भावात कांदा मिळणार आहे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters