1. बातम्या

Onion Rate: उन्हाळी कांदा बाजारात दाखल, मात्र मिळतोय कवडीमोल दर; कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणी सुरु देखील झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशिक पुणे सोलापूर सांगली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
summer onion harvesting start in pune [image credit-tridge.com]

summer onion harvesting start in pune [image credit-tridge.com]

राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे पुणे जिल्ह्यात उन्हाळी कांदा काढणी सुरु देखील झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशिक पुणे सोलापूर सांगली इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उन्हाळी कांदा काढणी सुरू झाली आहे.

या तालुक्यातील पूर्व भागातील कांदा लवकर लावला गेला असल्याने हा कांदा काढणीसाठी तयार झाला आहे. या भागातील उन्हाळी कांदा बाजारात दाखल होतोय मात्र कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कांद्यासाठी लागलेला उत्पादन खर्च कांदा पिकातून निघेल का असा शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे.

हेही वाचा:-लई भारी! 'या' शेतकऱ्याने डाळिंब बागात घेतले कांद्याचे आंतरपीक; आणि…….!

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते आंबेगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा बघायला मिळतो. या तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी उन्हाळी कांद्याचे भरघोस उत्पादन घेतात. असे असले तरी यंदा संपूर्ण राज्यात  निसर्गाचा लहरीपणा बघायला मिळाला आंबेगाव तालुक्यात सुद्धा निसर्गाचा लहरीपणा कायम होता.

उन्हाळी कांदा लागवडीच्या सुरुवातीपासून या पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागला आहे. कधी अवकाळी, कधी ढगाळ वातावरण, कधी दाट धुके यामुळे उन्हाळी कांदा पिकावर विपरीत परिणाम बघायला मिळाला. यामुळे शेतकरी बांधवांना अधिकचा उत्पादन खर्च आला असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा:-…. असं झालं तर कांद्याचे बाजारभाव पार करतील पाच हजरांचा टप्पा; जाणुन घ्या याविषयी

तालुक्यात आता उन्हाळी कांदा काढणी प्रगतिपथावर असून शेतकरी बांधव कांदा विक्रीसाठी लगबग करीत आहेत. मात्र सध्या कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला जवळपास तीन हजार रुपये क्विंटल एवढा बाजार भाव मिळत होता.

मात्र आता त्यात मोठी घट झाली असून पुणे जिल्ह्यातील मंचर एपीएमसीमध्ये अठराशे रुपये क्विंटल पर्यंतच बाजार भाव बघायला मिळत आहे. सध्या मिळत असलेला दर हा उत्पादन खर्च काढण्यासाठी देखील पुरेसा नसल्याचे शेतकरी बांधवांकडून सांगितले गेले आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, कांदा पिकवण्यासाठी सुमारे 17 रुपये किलोमागे खर्च म्हणजेच सतराशे रुपये क्विंटल खर्च अपेक्षित असतो त्यामुळे सध्या मिळत असलेला दर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च देखील भरून देणार नाही असे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांच्या मते, या उन्हाळी हंगामात कांदा लागवडीपासून निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागला आहे, निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा पिकावर रोगराईचे सावट कायम होते, परंतु कांदा पिकाकडून खूप मोठी आशा असल्याने महागड्या औषधांची फवारणी करून कांदा पीक जोपासले आहे. मात्र आता उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आणि कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी घसरण बघायला मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा फोल होताना दिसत आहे.

हेही वाचा:-Onion Price|| आता 'या' कारणामुळे कांद्याच्या भावात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात

English Summary: summer onion entered but the rate is decreased Published on: 16 March 2022, 09:59 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters