1. बातम्या

सल्फर मिल्स लिमिटेड शाश्वतता पर्यावरण आरोग्य आणि सुरक्षा यासाठी कटिबद्ध

KJ Maharashtra
KJ Maharashtra


जागतिक पर्यावरण दिन अर्थातच 5 जून 2020 रोजी सल्फर मिल्स ग्रुप ऑफ कंपनीज एका लक्ष्यासाठी एकवटली. हे लक्ष्य होतं पर्यावरण, शाश्वतता, आरोग्य आणि सुरक्षेप्रति असलेली आमची बांधिलकी उजागर करण्याचे. मूळात आमच्या समुहाचं मूल्यच शाश्वततेवर आधारित आहे. म्हणून जागतिक पर्यावरण दिवस आमच्या समुहाने आणि सहकाऱ्यांनी देशभरात शाश्वततेच्या मूल्यासाठी समर्पित करण्याचे ठरवले. या पाठीमागे मुख्य उद्देश होता शेतकऱ्यांमध्ये पर्यावरणपुरक अशा आधुनिक शेतीतंत्राबद्दल जागरूकता करणे. या अंतर्गत शेतकऱ्यांनी पिकांवर किटकनाशके आणि रसायनांचा सुयोग्य वापर करणे आणि अन्नद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन करण्याला प्रवृत्त व्हावे असाही आमचा उद्देश होता. त्यामुळे आम्ही हा संपूर्ण दिवस देशासाठी अन्नधान्याची निर्मिती करणाऱ्या आपल्या बळीराजाला समर्पित केला.

हा दिवस आम्ही आमच्या हृदयात चिरंतर जपून ठेवला आहे. तसेच भारतातील संपूर्ण शेती आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आमची बांधिलकीही आम्ही चिरंतर जपणार आहोत. आमचा समुहाने परिश्रमाने हा शेती उपयोगी ब्रँड निर्माण केला, आज त्याची जगभर ओळख आहे. आमच्या ब्रँडखाली आम्ही अन्नद्रव्य आणि पीक संरक्षण करण्यासाठी विविध पेटेंटेड उत्पादने तयार केली आहेत. त्याचा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात. कमी वापरात जास्त कार्यक्षमता हे या उत्पादनांचे वैशिष्ट्य आहे. या सर्वांसाठी आम्हाला शेतकरी आणि शेतकरी समुहांचा, आमच्या भागीदारांचा, विविध कृषी गटांचा आणि आमच्या कंपनीतील सहकाऱ्यांचा नेहमीच पाठींबा मिळतो, त्यासाठी आम्ही या सर्वांचे ऋणी राहू.

सल्फर मिल्सविषयी:

सल्फर मिल्स लिमिटेडची स्थापना 1960 मध्ये झाली. पीक संरक्षण आणि अ‍ॅग्रोकेमिकल क्षेत्रातली ही भारतातील आघाडीची कंपनी असून मुंबई, गुजरातसह विविध ठिकाणी कंपनीचे उत्पादन प्रकल्प आहेत. सल्फर मिल्स ही जगातील आघाडीची गंधक उत्पादक कंपनी आहे. खास उत्पादने आणि संयुगे आम्ही तयार करतो. याशिवाय सल्फर मिल्स ही जगभर उच्च मूल्य आणि क्षमतेची अ‍ॅग्रोकेमिकल्स तयार करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. मूल्यवर्धीत कृषी रसायनांची निर्मिती हे कंपनीचे वैशिष्ट्य आहे.

आम्ही एक जागतिक पातळीवरची कंपनी आहोत. आम्ही अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अमेरिका, आशिया, सीआयएस, मध्यपूर्वेकडील देश यांच्यासह जगभरातील 80 देश आणि खंडातील देशांना आम्ही उत्पादनांची निर्यात करतो. या घडीला सल्फर मिल्सच्या युरोप, ऑस्ट्रेलिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये स्वत:च्या सब्सीडरी कंपन्या आहेत. यापुढेही जगात विविध ठिकाणी कंपनी विस्तारित राहणार आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters