राज्यात सध्या ऊस गळीप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात आला असून जिल्ह्यासह परजिल्ह्यांतही साखर कारखान्याच्या माध्यमातून उसाचे गाळप सुरू आहे. मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे याकडे प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, उसाची नोंदणी केली असताना कारखान्याचे चिटबॉय सोडून मुकादम स्वतःच उसाचे फड ठरवत आहेत. तर मुकादम एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी करत आहेत. प्रत्येक वाहनासाठी 300 ते 500 रुपयांचा दर देऊन ही वरून ड्रायव्हरला जेवणाचा डबा द्यावा लागत असल्यामुळे शेतकऱ्यांची ऊस टोळीकडून लूटच सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
तसेच पैसे न दिल्यास या टोळ्या ऊस तोडत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव टोळ्यांना पैसे द्यावे लागत आहेत. खटाव तालुक्यातील तीन साखर कारखान्याबरोबर कराड, कोरेगाव, सांगली, कोल्हापूर, कडेगाव आदी भागातील कारखान्यांची तोड असतानाही या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
नरसू नाईक काळाच्या पडद्याआड, राजू शेट्टी यांचा सहकारी गेला, शेट्टींनी व्यक्त केले दुःख
सध्या कारखान्यांकडे टोळ्यांची संख्या कमी असल्याने कारखानदारांची अडचण झाली आहे. त्यामुळे ऊस तोड मजूर कमी असल्याचा गैरफायदा टोळीचे मुकादम घेत असून प्रत्येक कारखान्याकडे तोडणी यंत्रणा कमी आल्याने आपला ऊस कारखान्यांना वेळेत जाईल का नाही या चिंतेत शेतकरी आहे. यामुळे याचा फटका त्यांना बसू शकतो.
कारखान्यांतील अधिकाऱ्यांनी जरी टोळ्यांना अमूक शेतकऱ्याचा ऊस लागण केल्याची कारखान्यांकडे नोंद असून परिसरातील ऊस तोडायचे निर्देश दिले, तरी टोळी मुकादम जिकडे पैसे जास्त तिकडे ऊस तोड करत असल्यामुळे मुकादमांची मुजोरी वाढत चालली आहे, यामुळे आता यावर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
100 हून अधिक गायींना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालणार, धक्कादायक बातमी आली समोर..
यावर्षी अवकाळी पावसाच्या परिणामामुळे ऊस उत्पादन कमी निघत आहे. त्यातच उत्पादन खर्च तिप्पट वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे येणाऱ्या ऊस बिलाआधीच त्याच्यावर हे नवीन आर्थिक संकट उभं राहिलं आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
आजपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, शेतकऱ्यांसाठी काय घोषणा होणार?
ब्रेकिंग! तिरुवनंतपुरम विमानतळावर आणीबाणी घोषित..
100 हून अधिक गायींना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालणार, धक्कादायक बातमी आली समोर..
Share your comments