गोवा सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. ही बातमी म्हणजे ७०० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी २२३ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्याच्या स्वरुपात २.०८ कोटी रुपये देण्यात आले आहेत. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांपासून याबाबत मागणी केली जात होती.
२०१९ मध्ये संजीवनी साखर कारखाना बंद झाल्यानंतर, राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आगामी पाच वर्षे विशेष सहाय्य केले जाईल अशी घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळाले नव्हते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.
यामध्ये आता २२३ शेतकऱ्यांपैकी १०६ शेतकरी सांगेमधील, ५० शेतकरी काणकोणमधील तर ४० केपे आणि २७ शेतकरी सत्तरीमधील आहेत. कारखान्याचे प्रशासक चिंतामणी पेर्णी यांनी सांगितले की, सरकारने नुकसान भरपाई देण्यासाठी ७.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी मदत होणार आहे.
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना
ज्या शेतकऱ्यांनी घोषणापत्र दिले आहे, त्यांनाच ही नुकसान भरपाई मिळणार आहे. कारखाना बंद झाल्यानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता पैसे देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल, या गोष्टी आल्या अंगलट, जाणून घ्या..
ऐतिहासिक शेतकरी संपाच्या गावात ठरली रणनीती, 7 दिवसाचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा पेटणार आंदोलनाची मशाल
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
Share your comments