1. बातम्या

श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल, या गोष्टी आल्या अंगलट, जाणून घ्या..

श्रीलंका हा देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे आता देशात मोठा उद्रेक सुरु आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल सुरु आहे. असे असताना श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल झाले आहेत, जगातील विकसनशील देश कर्जाच्या विळख्यात अडकले असून, यातून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. यामुळे लवकरच या देशात देखील अशीच परिस्थिती येण्याची शक्यता आहे.

Not only Sri Lanka but also 69 other countries are poor

Not only Sri Lanka but also 69 other countries are poor

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका हा देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे आता देशात मोठा उद्रेक सुरु आहे. देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल सुरु आहे. असे असताना श्रीलंकाच नाही तर इतर ६९ देशही आहेत कंगाल झाले आहेत, जगातील विकसनशील देश कर्जाच्या विळख्यात अडकले असून, यातून बाहेर पडण्याचा त्यांचा मार्ग दिवसेंदिवस कठीण बनत चालला आहे. यामुळे लवकरच या देशात देखील अशीच परिस्थिती येण्याची शक्यता आहे.

७० देशांना यावर्षी ११ अब्ज डॉलरपेक्षा अधिक विदेशी कर्जाचे हप्ते द्यावे लागणार असून, तिजोरी रिकामी असल्याने हे पैसे कुठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या देशांमध्ये अर्जेंटिना, इजिप्त, ट्यूनिशिया, लेबनान, या बड्या देशांचा समावेश आहे. यामध्ये इजिप्त देशात युक्रेन संकटामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला आहे, केवळ ३ महिन्यांचा गहू शिल्लक आहे. यामुळे परिस्थिती अवघड झाली आहे.

तसेच ट्यूनिशिया देशात विदेशी कर्ज देशाच्या जीडीपीपेक्षा १०० टक्केपेक्षा अधिक आहे. महागाई ७ टक्क्यांपेक्षा अधिक. गृहयुद्धाची भीती त्याठिकाणी निर्माण झाली आहे. तसेच लेबनान देशात बैरुत स्फोटात देशातील सर्वात मोठा धान्याचा साठा नष्ट झाला आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. चलनाची किंमत ९० टक्क्यांनी घटली असून कर्ज जीडीपीपेक्षा ३६० टक्के अधिक आहे.

"स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा सगळे मागे सरकतात, हा अनुभव मला आहे"
आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का, कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला स्थगिती

तसेच अर्जेंटिना ९ वेळा विदेशी कर्जाचे हप्ते भरण्यास असमर्थ झाला आहे. अल-सल्वाडोर, पेरू, इथियोपिया, घाना, केनिया, तुर्की आणि दक्षिण आफ्रिकेवर कर्जामुळे कंगाल होण्याची वेळ आली आहे. यामुळे या देशांपुढे आता मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे आता हे देश यातून कसे सावरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
ऐतिहासिक शेतकरी संपाच्या गावात ठरली रणनीती, 7 दिवसाचा अल्टिमेटम, अन्यथा पुन्हा पेटणार आंदोलनाची मशाल
शेतकऱ्यांनो तापमानवाढीचा पशुधनावरील दुष्परिणाम, आणि उपाय जाणून घ्या
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना

English Summary: Not only Sri Lanka but also 69 other countries are poor. Published on: 24 May 2022, 10:56 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters