1. बातम्या

Sugarcane FRP; एफआरपीचे तुकडे होऊ देणार नाही, ऊस उत्पादकांसाठी किसान सभेचा मोठा निर्णय

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी फारच अडचणीत आला आहे. बाजारभाव, अतिवृष्टी, महागाई यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. असे असताना आता दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे किसान सभेने (Kisan Sabha) म्हटले आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
Kisansabha

Kisansabha

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी फारच अडचणीत आला आहे. बाजारभाव, अतिवृष्टी, महागाई यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. असे असताना आता दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे किसान सभेने (Kisan Sabha) म्हटले आहे.

यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल सुरू आहेत. कारखानदार आणि मंत्री संगनमताने ऊस एफ.आर.पी. चे (Sugarcane FRP) तुकडे पाडण्याचे मनसुबे रचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याचा ठराव किसान सभेने घेतला आहे.

यामुळे या प्रशांवरून येणाऱ्या काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. आता सांगली जिल्ह्यातील मिरज येथे किसान सभेचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष किसन गुजर (Kisan Gujar), राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले (Ajit Nawale) आणि राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख उपस्थित होते.

'शहाजीबापू पाटील यांच्यामुळे त्यांच्या भावावर गळफास लावून आत्महत्या करण्याची वेळ आली'

यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याची भूमिका किसान सभेने घेतली आहे. तसेच शेतकरी राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या (WaqfBoard) जमिनी (Agriculture Land) शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी देखील करत आहेत, मात्र याचा देखील निर्णय अजून झाला नाही.

या प्रश्नांवर सरकार लक्ष देत नाही. सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ पोकळ आश्वासन देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात दहीहंडी फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत.

मोठी बातमी! आता 'या' वाहनांमध्ये CNG आणि LPG किट लावा, केंद्राने दिली परवानगी..

त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पावित्रा घेणार आहे, अशी माहिती किसान सभेच्या वतीने अधिवेशनात देण्यात आली. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या काळात पेटणार आहेत. आता सरकार काय निर्णय घेणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
धक्कादायक! बकरा कापत असल्याचे स्वप्न पाहता पाहता स्वत:चे गुप्तांग कापले, शेतकरी रक्तबंबाळ
अखेर शिंदे सरकारमध्ये २ महिलांना मिळणार स्थान, पुणे जिल्ह्यातून 'या' महिला नेत्याची लागणार वर्णी..
शिंदे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! 50 हजार, पूरग्रस्तांना मदतीसह केल्या अनेक घोषणा

English Summary: Sugarcane FRP Kisansabha sugarcane growers will not allow FRP to be cut Published on: 24 August 2022, 10:09 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters