सध्या साखर कारखाने सुरु झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना उसाचा दर किती मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. आता भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना (Sugar factory) व किसन वीर-खंडाळा कारखान्याकडे गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळपाकरिता येणाऱ्या उसास प्रतिटन २ हजार ५०० रुपये एवढी पहिली उचल दिली जाणार आहे.
याबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद पाटील यांनी दिली. किसन वीर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन २ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय झाला आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दैनिकामध्ये ‘किसन वीर’ची पहिली उचल प्रतिटन २ हजार ३५० रुपये प्रसिद्ध करण्यात आली होती.
या वृत्तामुळे ‘किसन वीर’ व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, असे आमदर पाटील यांनी म्हटले आहे. तसेच गळीत हंगामाच्या अखेरीस एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल त्यानुसारच किसन वीर कारखान्याचा अंतिम दर राहणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतची लढाई आता रस्त्यावर सुध्दा लढणार
दरम्यान, ते म्हणाले किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे गळीताकरिता आलेल्या ऊसबिलाच्या पहिल्या पंधरवड्याचे बिल लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली. यामुळे हे पैसे लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
ब्रेकिंग! राज्यातील दोन जिल्ह्यात सापडल्या सोन्याच्या खाणी
सध्या कारखान्यांमध्ये उसाच्या दरासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कमी दर दिल्याने आणि काही ठिकाणी पैसे न दिल्याने शेतकरी नाराज आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे अजूनही मिळाले नाहीत. यामुळे शेतकरी
नाराज आहेत.
महत्वाच्या बातम्या;
अखेर राज्यपालांच्या हकालपट्टीचा मुहूर्त ठरला? शिवछत्रपतींचा अवमान केल्यामुळे होणार कारवाई
पालकांनो मुलांची काळजी घ्या, पुण्यात गोवरचे 5 रुग्ण, प्रशासन सतर्क
दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन, उसाच्या नवीन जातीचा लागला शोध
Share your comments