गेल्या काही दिवसांपासून राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांना चांगला ऊसदर मिळत नसल्याने दरवर्षी संघर्ष करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या मनाप्रमाणे भाव मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी नाराज आहेत.
असे असताना पुढील काळात साखरेपासून इथेनॉलची निर्मिती करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प जास्त दिवस चालू ठेवून साखर कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे जास्तीचे देता येणार आहेत. उसाच्या मळीबरोबरच उसाचा रस, पाक तसेच निकृष्ट धान्य यापासून इथेनॉल तयार करण्यास आधीपासूनचं मान्यता होती. परंतु आता त्यात साखरेचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वसामान्य लोकांना झटका! विजेच्या दरात होणार वाढ..
आता पडून असलेली साखर इथेनॉलकडे वळविल्यास साखर कारखान्यांना व्याजाचा बसणारा भुर्दंड कमी होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र शासनाने त्याकरिता एक समिती स्थापन केल्याचे समजते.
इथेनॉलसाठी साखर वळविणाऱ्या प्रकल्पांना सर्व माहितीच्या नोंदी काटेकोरपणे दररोज ठेवण्याचे आदेश देखील केंद्र शासनाने दिलेले आहेत. त्यामध्ये साखरेची आवक, इथेनॉलची निर्मिती पुरवठा आणि साठा याचा समावेश असणार आहे.
रात्री 6 ते 8 वाजेपर्यंत गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी गावाचा मोठा निर्णय
दरम्यान, साखरेचे साठे पडून राहिल्यास साखर कारखान्याचे पैसे अडकून पडतात. असे असताना आता इथेनॉल निर्मितीचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे इथेनॉल प्रकल्प ३०० दिवसापर्यंत चालविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्त दर मिळेल.
महत्वाच्या बातम्या;
ढसाढसा रडत शेतकऱ्यांनी थेट धरले अधिकाऱ्यांचे पाय, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! बीजिंग, झेंगझोऊमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
मशरूम गर्ल! नोकरी सोडून मशरूमची शेती, आता करोडोंची उलाढाल
Share your comments