सध्या सेंद्रिय खताचा प्रचार सगळीकडे होत चाललेला आहे जो की पीक गुणवत्ता आणि उत्पादनसाठी चांगला आहे असे शास्त्रज्ञ वर्गाचे सुद्धा मत आहे. सेंद्रिय शेतीमधून जे उत्पादन cनिघते त्यास बाजारात सुद्धा मोठी मागणी आहे.कोरोना काळापासून लोकांना आपल्या आरोग्यासाठी काय चांगले आहे आणि काय नाही हे समजले असल्याने सर्वांचा कल आता सेंद्रिय शेतीकडे ओळला आहे. शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेती करत आहेत आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सरकार करत आहे.
अनेक ठिकाणी मोफत सेंद्रिय खतांचे वाटप करण्यात आले:
सेंद्रिय खताचा जास्त वापर व्हावा म्हणून उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मोफत खताचे वाटप करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा सेंद्रिय खताचा वापर पिकांसाठी सुरू केला आहे. मुरादाबाद, यूपीमध्ये भात पिकासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मोफत खते देण्यात आली आहेत.
सेंद्रिय खतांचे फायदे:-
१. सेंद्रिय खतामुळे जमिनीची सुपीकता वाढते तसेच जमिनीचे आरोग्य चांगल्या प्रकारे सुधारते.
२. सेंद्रिय खताचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत आणि पिकांसाठी पोषक बनते.
३. सेंद्रिय खते कमी किमतीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
४. सेंद्रिय खताचा वापर करून शेतकरी आपले उत्पादन वाढवू शकतात.
५. सेंद्रिय खतांपासून उत्पादित केलेल्या पिकाला मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
६. सेंद्रिय खतापासून उत्पादित केलेली पिकांना चांगल्या प्रकारे भाव मिळून शेतकरी नफा भेटवू शकतो.
सेंद्रिय खतांचे तोटे:-
१. सेंद्रिय खताचे तोटे कमी आहेत, पण सेंद्रिय खताचा वापराला एक मर्यादा आहे.
२. जेव्हा पिकाला नायट्रोजनची गरज असते तेव्हा काही प्रमाणात युरियाची गरज असते.
३. आपण रासायनिक खतांपासून सेंद्रिय खतांकडे पूर्णपणे वळू शकत नाही.
४. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करता येतो, मात्र फक्त सेंद्रिय खतामुळे पीक घेणे अवघड आहे.
सेंद्रिय खताची किंमत किती आहे?
दिवाळी सणात सेंद्रिय खत १.५ रुपये प्रति किलोने मिळत आहे. जर तुम्ही 50 किलो खताचे पोते घेतले तर ते घनकचरा व्यवस्थापन प्लांटमध्ये फक्त 75 रुपयेमध्ये मिळेल. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांना या खतांच्या विक्रीतून पगार मिळतो.
Share your comments