1. बातम्या

धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान

मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई: राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता दिली आहे.

सन 2019-20 या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. तथापि धान उत्पादनाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्यानुसार राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना पन्नास क्विंटलच्या मर्यादेत प्रती क्विंटल पाचशे रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 2019-20 मधील पणन हंगामात मोठा दिलासा मिळणार आहे.

English Summary: Subsidy of Rs. 500 per quintal to the paddy grower farmers Published on: 13 December 2019, 08:23 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters