खासगी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

06 March 2019 08:06 AM


मुंबई
: राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रती शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. या योजनेचा लाभ 16 थेट पणन परवानाधारक आणि 11 खासगी बाजार परवाना धारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. मंत्रालयात सोयाबीन अनुदान योजनेमध्ये खासगी बाजार समित्यांचा समावेश करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

श्री. देशमुख म्हणाले, राज्यात खरीप हंगाम 2016-17 मध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सोयाबीनची बाजारातील आवक वाढवून सोयाबीनच्या दरात घसरण झाली होती. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने प्रथमच राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये सोयाबीन विक्री केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये आणि जास्तीत जास्त 25 क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये फक्त कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर शासनमान्य खासगी बाजार व थेट पणन परवानाधारक व्यक्ती/संस्था यांचे कामकाज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाप्रमाणेच सुरु असल्याने त्यांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार खासगी बाजार व थेट पणन परवानाधारकांना सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अनुदानासाठी शासन निर्णय 10 जानेवारी 2017 नुसार अटी व शर्ती निश्चित करण्यात येणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला अनुदान देण्यासाठी ज्या प्रमाणे नियम लागू केले होते त्याच नियमांचे पालन करण्यात येईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

subhash deshmukh Soybean सुभाष देशमुख सोयाबीन चंद्रकांत पाटील chandrakant patil
English Summary: Subsidies for farmers selling soybean in private market committees

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.