1. बातम्या

कृषि व संलग्न पदवीत स्पॉट राऊंङच्या विद्यार्थांच्या शिष्यवृत्ती प्रश्नावर पदवीधर संघटना उभारणार विद्यार्थी लढा

KJ Maharashtra
KJ Maharashtra

राज्यातील कृषी व संलग्न पदवीत यावर्षी स्पॉट राऊंङद्वारे (महाविद्यालय प्रवेश फेरी) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना "ङॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना" आणि "राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना लागू होणार नसल्याचे मार्च महिन्यात शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जाहीर केले.

रेग्युलर राऊंङद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थांना या शिष्यवृत्तींचा लाभ घेता येणार असुन स्पॉट राऊंङद्वारे प्रवेश घेणारे विद्यार्थी मात्र वंचित राहणार आहेत. कोरोनामुळे उद्भवलेल्या अघोषित आर्थिक आणिबाणीमुळे पालकांची आर्थिक परिस्थिती बिघङली असुन शासनाने स्पॉट राऊंङच्या तांत्रिक अङचणींवर उपाययोजना शोधुन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीस पात्र ठरवावे

 

अशी मागणी पदवीधर संघटनेचे ङॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संपर्कप्रमुख अजित देशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच कृषिमंत्री कृषिमंत्री यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.कृषि व संलग्न पदवीत यावर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्याकरता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रणव टोम्पे यांच्या मार्गदर्शनात राज्यव्यापी विद्यार्थी लढा उभारणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सपॉट राऊंङला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काची शिष्यवृती मिळवण्याकरता या विद्यार्थी लढ्यात सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन अजित देशमुख यांनी केले आहे.

 

विद्यार्थी लढ्यास जुळण्याकरीता संपर्क :

श्री. अजित देशमुख
संपर्कप्रमुख - पदवीधर संघटना
ङॉ. पं.दे.कृ.वि, अकोला
+91 72182 30121

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters