1. बातम्या

देशी उद्योगांचे संरक्षण करण्यासाठी खाद्य तेलाची आयात थांबवा : सोपा

KJ Staff
KJ Staff


पुणे, ऑगस्ट १३ : देशातील स्थानिक उद्योगांचे संरक्षण आणि त्यांना आणखी प्रोत्साहन,  मिळावे आणि   नागरिकांचे आरोग्य  चांगले राहावे.   म्हणून सरकारने खाद्य तेलाची आयात थांबवावी, अशी मागणी सोयबीन प्रोसेसर असोशिएनऑफ इंडियाने केंद्र सरकारने केली आहे. देशात फक्त दहा लाख टन खाद्य तेलाची आवश्यकता असताना मात्र आयात पंधरा लाख टनांची होत आहे. त्यामुळे अतिरिक्त ५ लाख टन  तेल आयातीवर निर्बंध घालण्यात यावेत आणि  हळूहळू देशांतर्गत खाद्य तेलबियांना प्रोत्साहन देऊन काही कालावधीनंतर आयात पूर्णपणे थांबवावी,  अशी मागणी  संघटनेने केली आहे.

गेल्या पंचवीस वर्षात देशातली तालाची आयात प्रचंड वाढली आहे. ९५ साली ही आयात १४  लाख टन होती ती आता २०२० मध्ये १५० लाख टन झाली आहे. परंतु हे होत असताना देशात तेलबियांच्या लागवडीला हवे त्या प्रमाणात प्रोत्साहन दिले गेले नाही. त्याचा विपरीत परिमाण होऊन भारत आजच्या घडीला सर्वात मोठा तेल आयातदार देश बनला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीचा आत्मनिर्भर भारताचा  विचार करून ही आयत कमी करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters