स्थानिक भुमिपुत्रांच्या नोकरीसाठी महाजॉब्स वेबपोर्टल लॉन्च

06 July 2020 04:56 PM By: भरत भास्कर जाधव

 

संपुर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. या काळात अनेकांचे रोजगार गेले, राज्यात असलेले बाहेरील राज्यातील मजुर परत आपल्या घरी परतले आहेत. सध्या अनलॉक करण्यात येत असून टप्प्याटप्पाने शहरे आणि उद्योग धंदे सुरू करण्यात येत आहेत. परंतु राज्यात निघून गेलेले कुशल मजुर परत येणार याची शाश्वती नाही. दरम्यान राज्यातील युवकांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी राज्य सरकारकडून महाजॉब्स वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतेच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे.

अशा  स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी कोरोना संसर्गामुळे कामगारांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची निश्चिती नाही, त्यामुळे  उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी ‘महाजॉब्स’ हे वेबपोर्टल तयार करण्यात आले आहे.  रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे अथक प्रयत्न व मार्गदर्शनाखाली  अत्यल्प वेळेत हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.

mahajobs web portal youth employment state government cm udhav thackarey महाजॉब्स मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार स्थानिकांना मिळणार रोजगार वेबपोर्टल महाजॉब्स वेबपोर्टल
English Summary: state youth get jobs from mahajobs webportal

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.