मराठवाडा-विदर्भासाठी खूशखबर! सावकारी कर्ज घेणारा शेतकरी घेणार मोकळा श्वास

09 March 2020 06:06 PM


मुबई : राज्यातील ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफी केली आहे. अवघ्या शंभर दिवसात कर्जमाफीचा निर्णय मार्गी लागला, यामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे. राज्य सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसह आणखीन एक आनंदाची बातमी दिली आहे. ठाकरे सरकारने आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जमाफी केले आहे. याबाबतचे वृत्त लोकमत या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान शासन निर्णयानुसार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर सरकार त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार आहे. हो अगदी खरं तुम्ही जे ऐकले ते अगदी खरं आहे. सरकार मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. शेतकऱ्यांनी जर परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असेल तर सरकार संबिधित सावकराला रक्कम देणार आहे. त्यामुळे सावकारी कर्ज घेतलेले शेतकरीही आता मोकाळा श्वास घेणार आहेत.  बँकेतील कर्ज सत्तेत येणारे कोणतेही सरकार माफ करत असत. परंतु सावकारी कर्जाविषयी मात्र कोणी बोलत नाही. छोट- मोठ्या कामासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत असतो. नेहमी-नेहमी बँकेचा दरवाजा ठोठावणं हे बळीराजाला शक्य नसतं. छोट्या कामासाठी बळीराजा सावकाराकडून कर्ज घेत असतो. याच संधीचा फायदा घेत सावकार चढ्या व्याजदराने कर्ज देत असतात.

यामुळे सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे.  मराठवाडा आणि विदर्भातील शेतीची अवस्था पाहिली असता हा निर्णय योग्य आहे. कारण येथे पावसाची अनिश्चिता अधिक असते. यामुळे येणाऱ्या आपल्या अल्प उत्पन्नातून अर्धा हिस्सा सावकराच्या हवाली करताना बळीराजाचे डोळे भरुन येत असतात. परंतु सरकारच्या हा निर्यण शेतकऱ्यांचे पाणावलेले डोळे पूसणारा आहे. यापूर्वी सावकाराने आपल्या परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेत अपात्र ठरवले होते. मात्र ही अट आता रद्द करण्यात आली आहे. यामुळे कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केले आहे, त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Vidarbha Region Marathwada farmer laon savkar Uddhav Thackeray state government thackeray government विदर्भ ठाकरे सरकार शेतकरी मराठवाडा सावकार कर्जमाफी loan waiver
English Summary: state government will paid savkari loan amount of Marathawada and vidarbh farmer

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय









CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.