1. बातम्या

नियमीत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून गिफ्ट

KJ Staff
KJ Staff


मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने बळीराजाला केंद्रबिंदू ठेवले आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शेतकरी आणि महिला वर्गातून स्वागत होत आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ-मोठ्या घोषणा अजित पवार यांनी केल्या. यात सर्वात आकर्षक घोषणा ठरली, ती म्हणजे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रोत्साहन निधीची घोषणा. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा उल्लेख करत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करण्यात आली.

हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या दोन ओळी सभागृहात सादर करत अजित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला. सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. शेतकऱ्यांना २०१५ ते २०१९ या कालावधीतील २ लाखपर्यंतची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जून २०२० पर्यंत नियमित कर्जाची परतफेड केली असेल. त्या शेतकऱ्यांना २०१८-१९ या वर्षात घेतलेल्या पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांची रक्कम प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. तसेच ही रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेच्या संपूर्ण रक्कम लाभ म्हणून देण्यात येईल, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.   

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters