गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचे संकट कायम आहे. असे असताना कोरोना काळात फक्त शेतीने अर्थव्यवस्थेला चालना दिली. सध्या ५ राज्यातील निवडणुकीची धामधूम सुरु आहे. यामध्ये गोव्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचे कारण म्हणजे या निवडणुकीत एक नवीन पक्ष सध्या उतरला आहे. हा पक्ष म्हणजे रेवल्युशनरी गोवन्स पक्ष. या पक्षाने नुकतेच कृषी व्हिजन जाहीर केले आहे. यात कृषी क्षेत्रातून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे, असे पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी सांगितले आहे. यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे, ते म्हणाले, की राज्यातील खाजन जमिनींचे रक्षण करण्यासाठी युवांना कृषी खात्यात आणायचे कधी प्रयत्न झाले नाहीत. राज्यातील शेती नष्ट करण्यात आली. याला सरकारचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. राजकारणात घुसलेल्या जमीन माफियांकडून शेतकऱ्यांना संपविण्याचा डाव आहे. खाजन जमिनी पुन्हा लागवडीयोग्य करण्याचा आमचा उद्देश आहे. असेही ते म्हणाले. यामुळे या निवडणुकीत हा पक्ष काय जादू करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत.
पक्षाचे प्रमुख मनोज परब म्हणाले, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक गावात कृषी सेवक असेल. यामुळे शेतकऱ्यांना मुख्य कार्यालयात ये-जा करून वेळ वाया घालवावा लागणार नाही. बांधला तडे पडून खारट पाणी शेतात घुसल्याने शेतीचे नुकसान होते. मुद्दामहून हे प्रकार केले जातात' असे परब म्हणाले. तसेच २०३० पर्यंत राज्यातील शेती पूर्णपणे सेंद्रिय करण्याचा उद्देश आहे. यासाठी शेतीत युवांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
गोव्यात प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील. शेतीला व्यावसायिक रूप दिले जाईल. उत्पादनाचे ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात येईल. शेतीक्षेत्र हे उद्योग क्षेत्र म्हणून विकसित झाले पाहिजे. मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत जे युवा शेती करू इच्छितात त्यांना कर्ज दिले जाईल, अशाप्रकारे अनेक आश्वासने त्यांनी दिली आहेत. तसेच त्यांना अनेक युवकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गोव्यात त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गोव्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
Share your comments