सध्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असताना आता जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, तर आम्ही तुम्हांला एका खास व्यवसायाची माहिती देणार आहे. हा व्यवसाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. शिवाय या व्यवसायासाठी तुम्हाला जास्त पैसे लागणार नाहीत. यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट लागेल ती म्हणजे शेतीसाठी जमीन, आणि अनेकांकडे जमीन असते. जर नसेल तर आपण ती भाड्याने देखील घेऊ शकतो. आपण ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो लेमन ग्रास फार्मिंगशी संबंधित आहे. काही लोक त्याला 'लिंबू घास' असेही म्हणतात.
एक हेक्टर जमिनीत त्याची लागवड करून तुम्ही वार्षिक ४ लाख रुपये कमवू शकता. जेव्हा मागणी जास्त असते तेव्हा तुम्ही उत्पादन वाढवून तुमचे उत्पन्न आणखी वाढवू शकता. लेमनग्रास वनस्पती एक रुपयापेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या वनस्पतीला प्राणी खात नाहीत आणि किडही लागत नाही. तुम्ही विचार करत असाल की या वनस्पतीची शेती करून उपयोग काय? तर, यातून निघणाऱ्या तेलाला बाजारात मागणी आहे. लेमन ग्रासपासून काढलेले तेल सौंदर्यप्रसाधने, साबण, तेल आणि औषधे बनवणाऱ्या कंपन्या वापरतात. यामधून तुम्हाला चांगले पैसे मिळतील.
तसेच याचे रोप दुष्काळग्रस्त भागातही लावता येते. या लागवडीसाठी खताचीही गरज भासत नाही. एकदा पीक पेरल्यानंतर ते ५-६ वर्षे टिकते. लेमन ग्रास लावण्याची वेळ फेब्रुवारी ते जुलै आहे. वर्षातून तीन ते चार वेळा कापणी केली जाते. यातून निघणाऱ्या तेलाचा दर १ हजार ते १५०० रुपये किलोपर्यंत आहे. लागवड केल्यानंतर चार महिन्यांनी पहिली काढणी केली जाते. लेमन ग्रास तयार आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, ते तोडल्यानंतर आणि त्याचा वास घेतल्यास त्यावरून समजते. यामुळे यामधून हमखास पैसे मिळतील.
लेमनग्रासची रोपवाटिका तयार करण्याचा उत्तम काळ म्हणजे मार्च-एप्रिल महिना. 'मन की बात' कार्यक्रमाच्या ६७ व्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेमन ग्रासच्या लागवडीचा उल्लेख केला होता. याचा संदर्भ देत ते म्हणाले होते की, या शेतीमुळे शेतकरी बांधव स्वत:ला सक्षम बनवत आहेत आणि देशाच्या प्रगतीतही हातभार लावत आहेत. यामुळे हा एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे. याद्वारे अनेकांनी चांगले पैसे कमवले आहेत.
Share your comments