1. बातम्या

अवघ्या 10 हजार रुपयांत घरीच सुरू करा हा व्यवसाय; दरमहा होईल कमाई 30 हजार रुपयांची

लोणचं बनवण्याचा व्यवसाय

लोणचं बनवण्याचा व्यवसाय

लोणचं आपल्या जेवणातील एक महत्त्वाचा घटक आहे. जेवणाला रंगत आणणारं हे लोणचं, तुम्हाला पैसेही कमवून देऊ शकतं. तुम्ही जर घरी बसून एखादा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर लोणचं बनवणं हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. घरातूनच तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

अवघ्या दहा हजार रुपयांत करा सुरूवात -

लोणचं बनवण्याचा व्यवसाय तुम्ही अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये सुरू करू शकता. तसेच, तुमच्या लोणच्याची मागणी, पॅकिंग आणि तुमच्या परिसरानुसार यातून महिन्याला 25 ते 30 हजार रुपये कमाई केली जाऊ शकते. तुम्ही हे लोणचं ऑनलाईन, रिटेल मार्केट आणि रिटेल चेन अशा विविध पर्यायांमार्फत विकू शकता.

हेही वाचा : Amul Franchisee Registraion : अमूलसोबत अशाप्रकारे सुरू करा व्यवसाय, होईल एवढी कमाई

लोणच्याचा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 900 वर्गफूट जागेची गरज आहे. लोणचं तयार करणे, वाळवणे तसेच त्याचे पॅकिंग  या सगळ्यासाठी मोठ्या आणि मोकळ्या जागेची गरज असते. लोणच्याचा व्यापार करण्यासाठी तुम्हाला परवान्याची गरज असते. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथोरिटी (FSSAI) मार्फत लायसन्स मिळवल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

 

पहिल्याच कामात गुंतवणूक वसूल -

लोणचं बनवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला दहा हजार रुपये खर्च (Pickle business cost) येतो. तसेच, पहिल्याच वेळी तयार करण्यात आलेल्या लोणच्यामधून तुम्ही जवळपास 20 हजार रुपये कमवू शकता. म्हणजेच, पहिल्याच कामात तुमची गुंतवणूक पूर्णपणे वसूल होते. यानंतर निव्वळ नफा मिळण्यास सुरुवात होते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters