1. बातम्या

गावात सुरू करा 'हे' पाच व्यवसाय; अन् कमवा लाखो रुपयांचा नफा

KJ Staff
KJ Staff


मोठ्या प्रमाणात लोक आजही गावात राहतात. परंतु गावात  रोजगाराच्या संधी नसल्याने नाईलाजाने त्यांना शहराकडे यावे लागते.  गावात राहुन रोजगाराच्या संधीविषयी माहिती मिळत नसल्याने बेरोजगाराचे प्रमाण अधिक असते.  परंतु गावात शहरांपेक्षाही अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत,  तेही आपल्या शेती व्यवसायात. आज आपण अशाच काही व्यवसायांविषयी माहिती जाणून घेणार आहोत.  या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपयांचा नफा कमावू शकता.

फुलांची शेती - सध्या कोरोना व्हायरसमुळे फुलांच्या शेतीवर संकट आले आहे. पण या शेतीमधून तुम्हाला मोठा नफा मिळत असतो. देशात विविध प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. विशेष म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात फुलांना मोठी मागणी असते. एक एकर जमिनीमध्ये तु्म्ही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकतात.

शेळीपालन - शेळीपालन हा पशूपालनातील एक प्रकार आहे. याच्या मार्गातून तुम्ही चांगले उत्पन्न मिळू शकता. डोंगराळ भागात आणि दुष्काळी भागात शेळीपालन अधिक केले जाते. या व्यवसायाला कमी गुंतवणूक लागत असते. शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते. कारण शेळ्यांच्या पालनासाठी मजुर लागत नाही. शेळीचे दूध, नंतर मांस याच्या माध्यमातून तुम्ही उत्पन्न मिळते. या व्यवसायातून तुम्ही एक ते दोन लाख रुपयांचा नफा तुम्ही मिळवू शकता.

कोरपडची शेती - या व्यवसायासाठी फक्त ४० ते ५० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागते. यासाठी तुम्हाला शेतात प्लांटेशन करावे लागेल. एकदा तुम्ही याची लागवड केली तर तुम्हाला ३ वर्षापर्यंत याचे उत्पन्न घेता येते. एका हेक्टरमध्ये कोरपडची लागवड केली तर तुम्हाला एका वर्षात साधारण ९ ते १० लाख रुपये या शेतीतून कमावू शकता.

डेअरी व्यवसाय - शेतीसह तुम्ही डेअरीचा व्यवसाय करु शकता. तु्मच्याकडे जर ५ ते १० गायी किंवा म्हैशी असतील तुम्ही डेअरीचा व्यवसाय अगदी उत्तम प्रकारे करु शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारकडून आणि दुसऱ्या खासगी संस्थांकडून आर्थिक साहाय्यता मिळत असते. डेअरीच्या व्यवसायातून तुम्ही साधारण १ ते २ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवू शकता.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters