1. बातम्या

कमी पैशात सुरू करा डाळींची मिल, दरमहा कमवा ५० हजार रुपये

कोरोनासारख्या संकटात शेतीची काम अविरीत चालू आहेत. आर्थिक घडी बसविण्यात शेती किंवा कृषी क्षेत्र मोलाचे काम करेल अशी अपेक्षा आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली. शेती हा देशाचा पाया मजबूत करत असते.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

कोरोनासारख्या संकटात शेतीची काम अविरीत चालू आहेत. आर्थिक घडी बसविण्यात शेती किंवा कृषी क्षेत्र मोलाचे काम करेल अशी अपेक्षा आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केली. शेती हा देशाचा पाया मजबूत करत असते. जर आपणही शेतीसंबंधीत काही व्यवसाय करण्याच्या विचारात आहात तर आम्ही आपल्याला काही आयडिया देत आहोत. त्यातून आपण नक्कीच आपला व्यवसाय सुरू कराल आणि लाखो रुपया कमवाल.  गेल्या काही दिवसांपासून देशात डाळींची आणि त्यापासून बनविण्यात आलेल्या उत्पादनाची मागणी मोठी वाढली आहे. यामुळे डाळींच्या किंमतीही वाढल्या आहेत. जर आपण डाळींचा व्यवसाय केला तर आपला निश्चितच फायदा होईल. डाळीची मिल आपण सुरू केल्यास आपले उत्पन्न सुरू होईल. डाळीचा गिरणी किंवा मिल सुरू करण्यासाठी आपल्यालाकडे २५ ते ३० वर्गफूट जागा हवी. जर जागा आपली स्वताची असेल तर आपण ३ एचपी मशीनने व्यवसाय सुरू करु शकता. पण यासाठी आपल्याला ४ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही ८ एचपी मशीनचा वापर कराल तर आपल्याला ८ लाख रुपये गुंतवावे लागतील.

मिल चालविण्यासाठी जीएसटी नंबर हवा असतो. यासाठी आपल्याला जीएसटी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर आपल्याला जीएसटी नंबर मिळेल.  मोकळ्या डाळीला किंवा पॅकिग डाळीला जीएसची लागत नाही. जर आपल्याला आपली ब्राँड बनवयाचा असेल तर आपल्याला जीएसटी लागतो. ब्रँडेड डाळ विकायची असेल तर आपल्याला ५ टक्के जीएसटी लागतो. 

जर आपल्याला आपल्या मालाची ब्राँडिंग करायची असेल तर आपल्याला खाद्य मंत्रालयाची परवानगी लागते. जर आपल्याकडे पॅन कार्ड आणि चालू खाते असेल तरच आपल्याला ही सुविधा मिळेल.  जर आपण एखाद्या भाडोत्री गाळ्यात दुकान चालवत असाल तर आपल्याकडे भाडोत्रीपत्राचे करार पत्र हवे. एमसीडीकडून दुकान चालविण्याचा परवाना घ्यावा लागेल.

 

डाळ मिल सुरू करण्याआधी आपल्याला आपली कंपनीची नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर परवाना घ्यावा लागेल. तुम्ही MSMES मधूनही परवाना घेऊ शकता.

याशिवाय फूड अथॉरिटी एफएसएसएआयकडून खाद्य अन्नाचा परवाना घ्यावा लागेल.

किती होईल फायदा -  डाळींचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला साधारण ५ ते ६ लाख रुपयांचा खर्च येईल.  ५ ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर आपण आपण दरमहा ५० हजार रुपयांची कमाई करु शकतो. मागणी वाढल्याने दरही वाढून आपले उत्पन्नही वाढते. रिटेल बाजारात आपल्याला १०० रुपये तर सेल मध्ये १० ते २५ रुपये प्रति किलो मागे निघत असतात. जर आपला ब्रँड सुरू करायचा असेल तर कंपनीचे नाव ठरवून ते पॅकिजिंग मध्ये टाकून त्याची विक्री आपण करु शकतो.  डाळ मिल्स साठी लागणाऱ्या मशीनविषयी आपण काही माहिती घेऊया

Pulse Mill

Automation Grade

Automatic

Production Capacity उत्पादन क्षमता

101-200 Kg/Hr

Machines Included

Grinding Machines

Recovery of Head Pulses

70-80%

Motor power मोटार ऊर्जा

1-3 HP, 5 HP

RPM

401-600

Motor type – मोटार प्रकार

Single phase

Recovery of Broken pulses

1-2%

Machine Material

Mild Steel

Power Source

Electric

Voltage व्होल्टेज

220 V

Frequency वेग

50-60 Hz


Pulse Mill Plant

 

Automation Grade

Automatic

Pulses type

Moong, Urad, Arhar, Masoor, Chana

Production Capacity

101-200 Kg/Hr

Recovery of Head Pulses

70-80%

Motor power

1-3 HP

RPM

401-600

Motor type

Three phase

Recovery of Broken pulses

Less than 1%

Power Consumption

3 HP

Machine Material

Mild Steel

English Summary: start pulses mill in low investment , earn 50 thousand per month Published on: 29 May 2020, 12:55 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters