सध्या पाणी पिण्यासाठी प्लास्टिक आणि स्टीलच्या बॉटलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. याच गोष्टीची दक्षता घेत केंद्र सरकार सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे परंतु या काळात सरकारने प्लास्टिच्या बॉटल तयार करण्यास परवानगी दिली होती. या बॉटलला कोणताच पर्याय नसलेल्या या बॉटलला आव्हान करत एमएसएमई (MSME) मंत्रालयाने एक पर्याय आणला आहे. एमएसएमई मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खादी ग्रमोद्योग आयोगाने ब्रास पितळ्याच्या बॉटल तयार करण्यास सुरुवात केली.
या बॉटलमुळे प्लास्टिकच्या बॉटलवर परिणाम होणार आहे. भारतात वाढेलेल्या प्रदूषणाला (pollution) संपविण्यासाठी सरकारने सिंगल यूज म्हणजे एकाच वापरात येतील अशा प्लास्टिकला मान्यता दिली होती. देशातील प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. यासाठी प्लास्टिकच्या बॉटलवर बंदी करण्यात आली पाहिजे. दरम्यान सरकारने पितळी बॉटल बाजारात आणल्यानंतर याकडे काही जण व्यवसायाच्या नजरेतून बघत आहेत. पितळी माल बनवून आणि त्यांची विक्री करुन आपण मोठी कमाई करू शकतो. या बॉटलची किंमत किमीत कमी ३०० असेल किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची असेल. साधरण ७५० मिली पाणी या बॉटलमध्ये बसू शकते. या बॉटल पर्यावरणाला पुरक आणि टिकाऊदार आहेत.
व्यवसाय सुरू करण्यास किती लागेल गुंतवणूक -
साधारण १.९५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून आपण हा व्यवसाय करु शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे काही विशेष स्किल असायला हवे असे नाही. दरम्यान व्यवसाय मोठ्या स्वरुपाचा करायचा असेल तर गुंतवणूक अधिक लागू शकते. घराच्या सजावटीसाठी लोक अनेक विविध वस्तूंचा उपयोग करत असतात. पितळापासून बनविण्यात आलेल्या वस्तूही सजावटीसाठी वापरल्या जातात.
जर आपल्याला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला खादी ग्रमोउद्योगाच्या या अहवालात दिलेल्या माहितीनुसार हा व्यवसाय करण्यास आपल्याला साधारण १ लाख ७० हजार रुपयांचा कच्चा माल खरेदी करावा लागेल. खर्चांविषयी इतर माहिती मिळवण्यासाठी आपण https://www.kviconline.gov.in/pmegp/pmegpweb/docs/commonprojectprofile/BAMBOO%20ARTICLE%20MANUFACTURING%20UNIT.pdf यावर क्लिक करून अधिक खर्चांची माहिती मिळवू शकतो.
Share your comments