1. बातम्या

कोरोना काळात घरात राहून सुरू करा व्यवसाय, होईल मोठी कमाई

कोरोना (Corona) काळात अनेकांची नोकरी गेली आहे. त्यांच्याकडे कमाई करण्याचा दुसरा मार्ग नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. अशा व्यक्तीसाठी हे अर्टिकल खूप महत्त्वाचे आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
घरगुती व्यवसाय

घरगुती व्यवसाय

कोरोना (Corona) काळात अनेकांची नोकरी गेली आहे. त्यांच्याकडे कमाई करण्याचा दुसरा मार्ग नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. अशा व्यक्तीसाठी हे अर्टिकल खूप महत्त्वाचे आहे. कारण तुम्ही घर बसून फक्त ५ हजार रुपयात हे व्यवसाय सुरू करू शकतात आणि आपला कमाई मार्ग मिळवू शकतात.

आयडियामधील सर्वात पहिला व्यवसाय आहे, मास्क बनवण्याचा. कोरोना संकटात अनेकजण आत्मनिर्भर होत आहेत, शिवाय मोदी सरकारही त्याला प्रोत्साहन देत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्क हे सर्वात मोठं हत्यार आहे. यामुळे मार्केटमुळे हा व्यापार खूप यशस्वी होत आहे. यानंतर दुसरा व्यवसाय हा लोणचं तयार करण्याचा आहे. हा व्यवसाय नेहमी आपल्याला नफा देणारा असतो.

ऑनलाईन करा कमाई

सध्या अनेकजण मास्क (Mask) बनवण्याचा व्यवसाय करत आहे. हा व्यवसाय फक्त पाच हजार रुपयांनी सुरू करता येतो. व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक शिलाई मशीन, कापड, आणि दोरी आणि रबरची गरज राहिल. तुम्ही ड्रेस मॅचिगचं मास्क बनवून विकू शकतात. हे आकर्षक असल्याने लोक हे मास्क घेण्याची इच्छा व्यक्त करतात. या मास्कची तुम्ही थेट विक्री करू शकतात किंवा ऑनलाईनपद्धतीने विकू शकतात. दरम्यान केंद्र सरकारही घरी बनवलेले मास्क घेण्यावर भर देत आहे.

 

आरोग्य महानिदेशालयानुसार, घरी बनलेल्या मास्कला सुरक्षात्मक कवर लावून केलं जाते. हे कोरोना पासून वाचण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. शिवाय हे मास्क आपण धुवून परत वापरू शकतो. मध्य प्रदेश राज्यातील ग्रामीण भागात ग्रामीण आजीविका मिशन कटनीच्या माध्यमातून स्वसय्यता गटाकडून मास्क बनवून घेतले. या महिलांनी आता पर्यंत लाखो रुपयांची कमाई देखील केली आहे.

 

घरगुती लोणचं आणि स्नॅक्स ( Pickle And Sanks )

लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान गाझियाबादमधील अमन जैन नावाच्या एका व्यक्तीने घरी लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी काही घरगुती स्नॅक्स बनवले. सुरुवातीला त्यांनी आपल्या मित्रांना खाण्यासाठी दिले. त्यानंतर व्हॉट्सअप(Whats App)चा उपयोग करत आपल्या व्यवसायाचा प्रचार केला. एका महिन्यात त्यांनी एक लाख रुपयांची कमाई केली.

English Summary: Start a business by staying at home during the Corona period, there will be big earnings Published on: 23 April 2021, 08:33 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters