1. बातम्या

Soybean Rate : उत्पादन कमी तरी हमीभावाच्या खाली सोयाबीनचा दर; जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्‍ट्रीय बाजारात खाद्यतेल स्‍वस्‍त झाल्‍याने विक्रमी आयात झाली. यामुळे देशात स्वस्त दराने खाद्यतेल आले. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला. सध्या सोयाबीनला दर कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक विंवेचनेत आहेत. यामुळे शेतकरी दर वाढण्याची वाट पाहत आहेत.

Soybean Rate News

Soybean Rate News

Soybean Rate Update : खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. तरी मात्र शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीन हमीभावाच्या खाली विकावे लागत आहे. उत्पादन कमी झाल्यामुळे चांगले दर मिळतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती मात्र ती फोल ठरली आहे. सध्या बाजारात सोयाबीनचे दर पाच हजारांच्या आतच आहेत. यामुळे शेतकरी आता दर वाढण्याची वाढ पाहत आहेत.

आंतरराष्‍ट्रीय बाजारात खाद्यतेल स्‍वस्‍त झाल्‍याने विक्रमी आयात झाली. यामुळे देशात स्वस्त दराने खाद्यतेल आले. त्यामुळे सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला. सध्या सोयाबीनला दर कमी असल्यामुळे शेतकरी आर्थिक विंवेचनेत आहेत. यामुळे शेतकरी दर वाढण्याची वाट पाहत आहेत.

यंदाच्या हंगामात सोयाबीन फुलोऱ्यात असताना पावसाने खंड दिल्याने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. पावसाच्या खंडापासून ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन जगवले त्या सोयाबीन मात्र पावसामुळे नुकसान झाल्याने त्याचा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. आता सोयाबीनचे उत्पादन कमी असतानाही सोयाबीनचे दर मात्र दबावातच आहेत.

सोयाबीनचे उत्पादन कमी झाले असताना देखील बाजार समिती सोयाबीनला हमीभावाच्या खाली शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर आहेत. यंदाच्या हंगामात सोयाबीन आधारभूत किंमत 4 हजार 600 रुपये जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षी 4 हजार 300 रुपये आधारभूत किंमत सरकारने जाहीर केली होती. यंदा या किंमतीत सरकारने 300 रुपयांची वाढ केली आहे.

शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजार भाव बाबत माहीती - शेतमाल सोयाबीन दर (दि.1 जानेवारी 2024)
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या संकेतस्थळावरुन आकडेवारी

बाजार समिती- आवक(क्विंटल)- कमीत कमी दर- जास्तीत जास्त दर- सर्वसाधारण दर
1)अमरावती- 4162- 4500- 4621- 4560
2)अकोला - 1453- 4195- 4670- 4635
3)यवतमाळ- 269- 4400- 4675- 4537
4)वाशीम- 3000- 4475- 4650- 4550
5)कारंजा- 2000- 4470- 4670- 4590

English Summary: Soybean Rate Soybean rate below guaranteed price even though production is low Know today rates Published on: 01 January 2024, 05:11 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters