सोयाबीन उत्पादनात वाढ होण्याची शक्यता; पण...

24 July 2020 12:47 PM By: भरत भास्कर जाधव

मुंबई: मागील वर्षाच्या तुलनेत देशात यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे. पण जर वरुण राजाने कृपा दृष्टी दाखवली नाही तर पेरणी वाया जाईल. दरम्यान सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन ऑफ इंडियाने (SOPA) च्या मते  सोयाबीनला पुढील आठवड्यात पावसाची गरज लागेल, जर पाऊस नाही झाला तर उत्पन्नावर त्याा परिणाम होईल.  दरम्यान सोपाने जुलैच्या दुसऱ्या हप्तापर्यंतचा सोयाबीन पेरणीची स्थिती आपल्या अहवालातून स्पष्ट केली आहे.

यानुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पिकांची स्थिती साधरण आहे.  मध्यप्रदेशात जुलै्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधरण ५० टक्के पेरा झाला होता. तर बाकीची पेरणी पुढील आठवड्यात झाली. बाकी पिकांना पुढील एक किंवा दोन आठवड्यात फुले येतील.  सोपा SOPAनुसार, पिकांची स्थिती व्यवस्थीत आहे, पण पुढील आठवड्यात सोयाबीनला पावसाची आवश्यकता पडू शकते.

तर निमाड परिसरातील पिकांवर पिळवा मोजॅक नावाची विषाणूचा प्रभाव दिसत आहे. या प्रदेशातील काही भागात किडीचा प्रादुर्भाव पडला होता, परंतु कीटकनाशकांच्या वापराने त्यावर शेतकऱ्यांनी नियंत्रण मिळवले आहे.  तर सर्वाधिक  सोयाबीन उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रात निकृष्ट बियाणांमुळे २५ टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. अगाऊ लागवडीनंतर सोयाबीन पेरा उगवण्यास उशिर झाल्यानंतर निकृष्ट बियाणांचे प्रकरण समोर आले होते. दरम्यान दुबार पेरणीनंतर येथील स्थिती चांगली आहे. परंतु पुढील आठवड्यात लातूर, उस्मानाबाद, आणि बीड जिल्ह्यात पाऊस पडणे आवश्य़क असल्याचे SOPA ने सांगितले आहे. 

दरम्यान कपाशीनंतरचे दुसरे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा आता ३९ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र ३८ लाखाच्या आसपास आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत सोयाबीनचा पेरा २९ लाख हेक्टरच्या आसपास होता. गेल्या वर्षाची तुलना करता यंदा पेरा सद्यस्थितीत ३३ टक्के जास्त आहे. पेरणी होऊन आता दोन आठवडे झाले असून पुढील आठवड्यात शेतकऱ्यांवर वरुण राजाने कृपा केली पाहिजे. नाहीतर सोयाबीनचे उत्पादनात घट होईल यात शंका नाही.

Soybean Soybean production Soybean farming soyabean sowing kharif Soybean cultivation Soybean production increase सोयाबीन उत्पादन सोयाबीन उत्पादक सोयाबीन लागवड सोयाबीन पेरणी सोयाबीन पेरा सोयाबीन पेरणीत वाढ
English Summary: Soybean production is likely to increase, but..

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.