1. बातम्या

खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी

KJ Staff
KJ Staff

राज्यात खरीप हंगामात पिक पेरणीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे यंदा 94 94 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्याच्या सर्व भागात मान्सून सक्रीय झाला असून राज्यात 1 जून ते 21 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 757.7 मि.मी. म्हणजेच एकूण सरासरीच्या 91.1 टक्के पाऊस झाला आहे. तसेच खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

खरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी

राज्यात खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140.69 लाख हेक्टर असून 16 ऑगस्ट 2018 अखेर 132.85 लाख हेक्टर क्षेत्रावर (94 टक्के) पेरणी झाली आहे. तसेच ऊस पिकासह असणाऱ्या 149.74 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 134.69 लाख हेक्टर म्हणजेच 90 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यात 30 लाख 78 हजार 135 हेक्टर क्षेत्रावर तृणधान्ये, 20 लाख 28 हजार 370 हेक्टरवर कडधान्य आणि 41 लाख 16 हजार 513 हेक्टरवर तेलबिया पिकाची प्रत्यक्ष पेरणी-लागवड करण्यात आली आहे. तसेच 40 लाख 62 हजार 387  हेक्टरवर कापूस आणि 1 लाख 83 हजार 875 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आली आहे.

राज्यात भात व नाचणी पिकांच्या पुनर्लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून पिके वाढीच्या ते फुटवे फुटण्याच्या अवस्थेत आहेत. पेरणी झालेल्या पिकांमध्ये आंतर मशागतीची व पिक संरक्षणाची कामे सुरु आहेत. काही भागात कापूस पिकावर झालेल्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 20 जिल्ह्यांसाठी 4 लाख 20 हजार सापळे व 12 लाख 42 हजार ल्युअर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बोंडअळी नियंत्रणांतर्गत किटकनाशकांसाठी 8 कोटींची तरतूद करण्यात आली असून कीड व्यवस्थापनासाठी अतिरिक्त 17 कोटी देण्यात आले आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters