इंडियन टी एक्सपोर्ट असोसिएशन अध्यक्ष अंशुमन कनोरिटा यांनी शुक्रवारी सांगितले की भारतीय चहाच्या अनेक खेपा अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत खरेदीदारांनी उच्च कीटकनाशके आणि रसायनांमुळे नाकारले आहेत.
या आधी एक दिवस आगोदर तुर्की या देशाने भारतीय गहू परत केला होता, त्यात रुबेला विषाणू आहे. तुर्कस्तानने फायटोसॅनिटरीच्या चिंतेमुळे भारतीय गव्हाची खेप नाकारली होती.श्रीलंकेतील आर्थिक संकटानंतर जागतिक स्तरावर चहाच्या निर्यातीत पोकळी निर्माण झाली आहे.
टी बोर्ड ऑफ इंडिया ला टी बोर्डाची निर्यात वाढवून या संधीचा फायदा घ्यायचा आहे.तथापि चहाची खेप नाकारणे आणि परत केल्यामुळे परदेशातून पाठवण्याचे प्रमाण कमी होत आहे. देशात विकल्या गेलेल्या सर्व चहाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण नियमांचे पालन केले पाहिजे. परंतु कनोरिया यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बहुतेक खरेदीदार चहाची खरेदी करत आहेत त्यात रासायनिक सामग्रीचे प्रमाण जास्त आहे.
2021 मध्ये भारताने 195.9दशलक्ष टन चहा निर्यात केली.कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडेंट स्टेटसआणि इराण भारताकडून सर्वाधिक चहा खरेदी करतात. भारतीय चहा मंडळाने यावर्षी 300 दशलक्ष टन चहानिर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
याबाबतीत ते म्हणाले की अनेक देश चहा खरेदीबाबत कठोर मानकांचे पालन करत आहेत. बहुतेक देश EU माणकाप्रमाणेच नियमांचे पालन करतात. जे आमच्या FSSI नियमापेक्षा अधिक कठोर आहेत. कायद्याचे पालन करण्याऐवजी, बरेच लोक FSSAI निकषांना आणखी उदार करण्यासाठी सरकारला आव्हान करत आहेत. ते म्हणाले, चहा हे आरोग्यदायी पेय म्हणून गणले जात असल्याने ते चुकीचे संकेत देईल.
चहा बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की या मुद्द्यावर चहा पॅकर्स आणि निर्यातदारांकडून तक्रारी आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Tea Side Effects: तुम्हीही चहाप्रेमी आहात का? मग थोडं थांबा अन वाचा चहाचे साईड इफेक्ट्स
नक्की वाचा:म्हातारपण करा आरामदायी, घ्या लाभ 'या' योजनेचा मिळवा दरमहा 5 हजार रुपये
नक्की वाचा:20 हजारात 'या' फुलाची लागवड करा अन कमी कालावधीत कमवा लाखों, वाचा
Share your comments