1. बातम्या

बाप रे! सोलापूर च्या बाजार समितीत एकाच दिवशी ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक, मात्र कांद्याच्या दरात घसरण

कांद्याची बाजारपेठ म्हणून नाशिक जिल्ह्याला ओळखले जाते मात्र नाशिक च्या पाठोपाठ सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोलापूर ची सोयीची बाजारपेठ असल्याने त्या ठिकाणी नेहमी वाहनांच्या रांगा लागतात. खरीप हंगामातील लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने हा कांदा सोलापूर च्या बाजरपेठेत दाखल झालेला आहे. सोलापूर च्या सिद्धेश्वर कृषी बाजार समितीमध्ये सलग तीन दिवसाच्या सुट्टी नंतर तब्बल ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असल्याने कंदयाच्या दरात २०० ते २५० रुपये ने घसरण झाली आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
onion

onion

पोषक वातावरण असले की शेतकरी आपल्या शेतात नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असतो मात्र प्रतिकूल परिस्थितीत जर प्रयोग करायचे म्हणले तर थोडं जडच जात. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावामध्ये या शेतकऱ्याच्या उपक्रमाने सर्वांना चकित केले आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जण भीती तसेच लॉकडाउन चा विचार करत आहे परंतु मसला खुर्द गावातील अॅड सोमेश वैद्य यांच संपूर्ण कुटुंब पेरूची बाग जोपासण्यात दंग आहे. वैद्य कुटुंबाने १८ महिने चांगल्या प्रकारे पेरूच्या बागेची जोपासना केली आहे याचेच फळ म्हणून त्यांना २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वैद्य कुटुंबाने आपल्या शेतात पीक वाणाच्या जातीचा पेरू लावला होता त्यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे.

बाजार समितीमसोर 700 वाहने :-

खरीप हंगामातील कांद्याची सध्या काढणी चालू असल्यामुळे सध्या जे बाजारात दर चालू आहेत त्याच दराप्रमाणे शेतकऱ्यांना कांद्याची विक्री करता लागणार आहे. शनिवारी बाजार समितीत सुमारे ७०० कांद्याच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अचानक एका दिवशी बाजारात कांद्याची एवढी आवक झाली की थेट कांद्याचे दर २०० ते २५० रुपये ने घसरले गेले. उस्मानाबाद, परंडा, पंढरपूर, माढा भागातून शेतकऱ्यांच्या कांदा सोलापूर च्या बाजार समितीमध्ये दाखल होतो.

यामुळे झाली विक्रमी आवक :-

२०२२ उजडायच्या आधी सोलापूर च्या बाजार समितीत सुमारे ३० ते ३५ क्विंटल कांद्याची झाली होती जे की आता खरीप हंगामातील कांद्याची नव्याने काढणी सुरू आहे. त्यात सोलापूर मध्ये सिद्धेश्वर यात्रेमुळे बाजार समितीला तीन दिवस सुट्टी असल्याने शनिवारी अचानक ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण पाहायला भेटली. १७०० रुपये प्रति क्विंटल असलेला कांद्याचा दर आता थेट १५०० रुपये वर आलेला आहे.

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान :-

पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विभागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता जे की ढगाळ वातावरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. रविवारी रात्री बार्शी, उस्मानाबाद तसेच परांडा या भागात पाऊसाने आपली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पळताघाई झाली. ज्या कांद्याची छाटणी केली होती तो कांदा शेतात च राहिला आणि अवकाळी पाऊसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात पडलेल्या कांद्याचे नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान :-

पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा विभागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता जे की ढगाळ वातावरण झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली. रविवारी रात्री बार्शी, उस्मानाबाद तसेच परांडा या भागात पाऊसाने आपली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पळताघाई झाली. ज्या कांद्याची छाटणी केली होती तो कांदा शेतात च राहिला आणि अवकाळी पाऊसाने अचानक हजेरी लावल्याने शेतात पडलेल्या कांद्याचे नुकसान झाले.

English Summary: Solapur market committee receives 71,000 quintals of onions in a single day, but onion prices fall Published on: 27 January 2022, 02:24 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters