मागच्या दोन महिन्यापासून विचार केला तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक होत आहे.सोलापूर बाजार समितीने लासलगाव नंतर कांद्याचे सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवला आहे.
लासलगाव बाजार समितीला मागे टाकत सोलापूर बाजार समिती मध्ये एकाच दिवशी एक लाख 26 हजार क्विंटल कांद्याची विक्रमी आवक झाली होती. यामागील प्रमुख कारण याचा विचार केला तर सोलापूर एक मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या ठिकाणी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी ही बाजारपेठ महत्त्वाची आहे. मध्यवर्ती बाजारपेठ असल्यामुळे येथे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. विक्रमी आवक झाल्यानंतरही या बाजार समितीत सरासरीच्या तुलनेत कांद्याला भाव मिळाला आहे. जर मागच्या महिन्यातील कांदा भावाचा विचार केला तर सर्वात जास्त दर हा 2 हजार 600 रुपये तर सर्वात कमी दहा 1350 रुपये मिळाला होता. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पिकाची आवक पडण्याची प्रमुख कारण म्हणजे शेतकऱ्यांमध्ये शेतमाला विषयी वाढीव दराची अपेक्षा कायम राहते. हाच उद्देश सोलापूर कृषी उत्पन्न बाजार पेठेत साध्य होत आहे.
जर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा विचार केला तर इतर बाजार समितीच्या तुलनेमध्ये अधिकचा दर आणि ज्या दिवशी कांदा लिलाव होतो त्या दिवशी पैसे मिळतात. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सोबतच मराठवाडा, कर्नाटक राज्यातून शेतकरी कांदा विक्रीसाठी सोलापूर बाजार समितीत आणतात. कांदा आवकेचा विचार केला तर ही आवक डिसेंबर महिन्यातच वाढत असते पण पावसामुळे यंदा कांदा लागवड लांबणीवर पडली.त्यामुळे डिसेंबर महिन्यात कांद्याची आवक कमी झाली पण सध्या आवक वाढलीआहे.
कमी जागेत अधिकचे उत्पादन
वातावरणातील बदलाचा परिणाम कांदा पिकावर झाला असला तरी शेतकऱ्यांना वेळोवेळी घेतलेल्या काळजीमुळे उत्पादनावर त्याचा फारसा परिणाम झालेलानव्हता.शेतकऱ्यांनी कमी जागेत अधिक उत्पादन हे तंत्र अवगत केले आहे.
शिवाय कांदा पिकाचे नुकसान आता फायदा असे म्हणून लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे. बाजार समितीमधील व्यवहार आणि शेतकऱ्यांची जोडलेली नाळ यामुळे आवकवाढत आहे.दोन महिन्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे सोलापूर बाजार समिती प्रशासनावर बाजार बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. परंतु तरी सुद्धा कांदा दरावर त्याचा फारसा परिणाम झालेला नव्हता. सध्या बाजारपेठेत व्यवहार सुरू असून आवक की वाढलेलीच आहे.
Share your comments