1. बातम्या

'ही' जिल्हा बँक देत आहे नागरिकांना या जबरदस्त कर्ज योजना, या लोकांना मिळू शकतो भरपूर फायदा

जिल्हा बँक म्हटले म्हणजेग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेली बँक म्हणून जिल्हा बँकेचीओळख आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळेसकर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
solapur district central bank anounce to verious attractive loans scheme

solapur district central bank anounce to verious attractive loans scheme

जिल्हा बँक म्हटले म्हणजेग्रामीण भाग, शेती आणि शेतकरी यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेली बँक म्हणून जिल्हा बँकेचीओळख आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळेसकर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.

ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा या जिल्हा बँक असतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कायम शेतकऱ्यांच्या सेवेत तत्पर अशा या बँक असतात. शेतकरीच नाही तर गावातील छोटे-मोठे उद्योजक, छोटे-मोठे धंदेवाईक यांनादेखील जिल्हा बँक जवळच्या वाटतात.

अशीच एक जिल्हा बँक या बँकेने वेगवेगळ्या स्वरूपात कर्ज वाटपाच्या योजना नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. ही जिल्हा बँक म्हणजे सोलापूर जिल्हा सहकारी बँक होय. या बँकेने  पगारदार नागरिक आणि व्यापाऱ्यांसाठी कर्ज वाटपाच्या नवीन आकर्षक योजना आणल्या आहेत. त्याची माहिती या लेखात घेऊ.

 सोलापूर जिल्हा बँकेच्या कर्ज वाटप योजना

 जर सोलापूर बँकेचे मागचे काही वर्षांचा इतिहास पाहिला तर 2018 हे वर्ष खूप तारेवरच्या कसरतीचा व आर्थिक संकटांचे होते. शेतकऱ्यांची जिव्हाळ्याच्याअसणाऱ्या बँकेत शेतकऱ्यांना देण्यासाठी एक रुपया देखील नव्हता.त्यामुळे या बँकेचा कारभार प्रशासकांच्या ताब्यात देण्यात आला.परंतु कालांतराने ठेवी येऊ लागल्याने कर्जाचा पुरवठा करणे बँकेला शक्य झाले.

जे घटक वेळेवर कर्ज परत करू शकतील अशा घटकांना नजरेसमोर ठेवून नवीन कर्ज वाटप योजना निश्चित करण्यात आले. एकेकाळी शेतकऱ्यांना एकही रुपया द्यायला शिल्लक नसलेल्या या बँकेने आता मध्यम मुदत कर्ज वाटप शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरू केले असून 30 जून पासून हे कर्जवाटप सुरू होईल असे बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक रावसाहेब जाधव यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या मध्यम मुदत कर्ज वाटपात सोबतचमालमत्तेवर देखील कर्ज देणे बँकेने सुरू केले आहे. ते खालील प्रमाणे….

1- लोन अगेस्ट प्रोपर्टी ही नवीन कर्ज योजना सोलापूर जिल्हा बँक राबवणार असून या योजनेच्या माध्यमातून40 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. तसेच पगारदार यांसाठी नंदिनी गृहकर्ज योजना बंद करण्यात आलेली होती परंतु ती आता पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

2- तसेच जे नियमित पगारदार नोकर आहेत तसेच उद्योजक, व्यापारी वर्ग व व्यावसायिकांनाघर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी 30 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

3- तसेच लहान लहान व्यापारी व उद्योजकांसाठी मध्यम मुदत 35 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे व महत्त्वाचे म्हणजे यात घटकांना एक लाखापर्यंत कॅश क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.

4- तसेच व्यापारी, व्यावसायिक उद्योजकांसाठी नवीनवाहन घ्यायचे असेल तर त्याच्या खरेदीसाठी 30 लाखांपर्यंततर पगारदार नोकरदारांसाठी 20 लाखांपर्यंत  कर्जाचे वाटप केले जाणार आहे.

5-तसेच पेट्रोल व डिझेल पंपासाठी कॅश क्रेडिट मध्यम मुदत 50 लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.(स्रोत -मंगळवेढा टाइम्स)

 महत्त्वाच्या बातम्या

नक्की वाचा:रोज ५० रुपये जमा करून मिळवा ३५ लाख, पोस्ट ऑफिस योजनेबद्दल जाणून घ्या

नक्की वाचा:टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! संपूर्ण देशात दोनच आठवड्यात टोमॅटोच्या भावात दुप्पट वाढ, दर शंभरी पार

नक्की वाचा:महत्त्वाचा शासन निर्णय! दुधाला एफआरपी लागू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन

English Summary: solapur district central bank anounce to verious attractive loans scheme Published on: 24 May 2022, 01:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters