आतापर्यंतच्या कांद्याच्या इतिहासात सोलापूर बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कांद्याची आवक झालेली आहे. प्रथमच कांद्याचे १२०० ट्रक बाजार समितीत दाखल झाले आहेत. एकाच दिवशी एवढ्या प्रमाणत कांद्याची आवक झाल्यामुळे जवळपास १६ कोटी रुपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती सांगितली आहे. लालसगाव बाजार समिती महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते मात्र यंदा सोलापूरच्या बाजार समितीने त्यास मागे टाकले आहे. सोलापूर बाजार समितीने भारतातील सर्वात जास्त कांद्याची आवक केल्याचा मान पटकवला आहे. जरी मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली असली तरी सुद्धा कांद्याचे दर मात्र स्थिर आहेत.
1961 पासूनची विक्रमी आवक :-
१९६१ साली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली होती जे की आता पर्यंत इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झालेली आहे त्यामुळे भारतात सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने मान पटकवला आहे.
लासलगावला मागं टाकलं :-
महाराष्ट्रात सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून लासलगाव बाजार समितीला ओळखले जाते. भारत देशात लासलगाव बाजार समितीची कांदा बाजारपेठेत नेहमी चर्चा असते परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याच्या १२०० ट्रकची आवक झालेली आहे त्यामुळे लासलगाव च्या बाजार समितीला सुद्धा माघे टाकले आहे.
कांद्याची विक्रमी आवक दर स्थिर :-
आता पर्यंत सर्वात जास्त कांद्याची आवक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत होत होती मात्र यंदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे १२०० ट्रक आवक झालेली आहे. आवक तर मोठ्या प्रमाणात झालेली आहे मात्र कांद्याचे भाव स्थिर असल्याचे चित्र दिसत आहे.
16 कोटींची उलाढाल :-
सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या १२०० गाड्या दाखल झालेल्या आहेत जे की एका दिवसात सुमारे १६ कोटी रुपयांची उलाढाल होईल असा अंदाज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यांकडून सांगितला आहे.
Share your comments