अनेकजण मला हा प्रश्न विचारतात, काहीजण या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात.प्रश्न लहान आहे.पण उत्तर नाही. व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, समाजाला काय देऊ शकतो ? असा उद्देश असावा.जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हा प्रश्न विचारता मी कोणता व्यासाय करू ? तर तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असत ? कि असा व्यवसाय सांगावा जो मस्त चालेल, असा व्यवसाय सांगावा जो करणे सोपे असेल, असा व्यवसाय सांगावा ज्यात कमी गुंतवणूक असेल.
कोणता व्यवसाय सुरु करू ? हा प्रश्नच मुळात सुरक्षात्मक आहे. तुम्हाला उत्तरात असा व्यवसाय अपेक्षित आहे ज्यात धोका कमी आहे.You would expect a business in the answer that has less risk.
बापरे.... आता पावसाप्रमानेच आला नोकऱ्यांचा महापूर! 'एसएससी'मार्फत तब्बल 73,333 पदांसाठी भरती.
तुम्हाला जर सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी कडे जावे. तुम्हाला जर जास्त धोका घ्यायचा आहे तर व्यवसायाकडे यावे. आपण जो व्यवसाय करणार आहोत, त्यात यश मिळेल कि नाही ? तो टिकेल का नाही ? किंवा त्याच प्रारूप किती बदलून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचाच, हे तुमच नक्की झाले तर हा ना तो व्यवसाय तुम्ही करालच!महत्वाचं आहे व्यवसाय करण्याची तुमची मानसिकता होणं, ती झाली की, तुम्ही स्वतःसाठी योग्य व्यवसाय शोधून काढणार वा निर्माण करणारच!
आता आपला प्रश्न कोणता व्यवसाय सुरु करावा ? ह्या प्रश्नांचं उत्तर शोधताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतील.१.माझी आवड काय?२.माझ्याकडे कोणते गुण आहेत?या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य जर तुम्ही गाठला तर फार चांगले होईल.अशी गोष्ट शोधणे जी मला आवडते आणि जी करण्यासाठी लागणारे थोडेफार गुण माझ्यात आहेत. मला फिल्म्स पाहायला फार आवडत, म्हणून मी नट वा दिग्दर्शक व्हायचा निर्णय घेतला नाही. कारण ते बनण्यासाठी लागणारे गुण माझ्यात आहेत असा मला वाटले नाही. म्हणून अशी गोष्ट निवडणे जी तुम्हाला आवडते आणि तुमच्यात ती करण्याचे गुण पण आहेत!
तुम्हाला व्यवसायात यश कधी मिळेल ?जेव्हा तुमच्याकडे प्रतिस्पर्ध्यापेक्षा काहीतरी चांगले असेल. तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगल काही केव्हा करू शकाल ? त्यासाठी तुम्हाला काय कराव लागेल ? तुम्हाला त्या गोष्टीचा तज्ञ बनाव लागेल. गोष्ट मनापासून आवडली नाही तर तुम्ही त्या गोष्टीचे तज्ञ होवू शकाल का ?तज्ञ झाल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकाल का ? आणि तुम्ही ती इतरांपेक्षा चांगली करू शकत नाही, मग लोक तुमच्याकडे का येतील ?अनेक लोक स्वतःच्या व्यवसायात नोकरी करू लागतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीवर ते स्वत:च बंधन लावतात.
विकता येणेविकता येण का आवश्यक आहे !आपण सर्वजण काय करतोय ? नोकरीच्या मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय करता ?लग्नासाठी स्थळ पाहायला जाता तेव्हा तुम्ही काय करता ? नातेवाईकांना, मित्रांना तुमच्या नवीन विकत घेतलेल्या गोष्टी दाखवताना काय करता ? बॉस ला गुड मॉर्निंग बोलून काय करता ? तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली कि तुम्ही काय करता ?आपण स्वतःला विकत असतो. स्वतःला विकणे म्हणजे पैशासाठी काहीही करायला मी तयार आहे आहे, असे नाही. तर दुसऱ्याच लक्ष्य स्वत:वर
ओढवणे दुसऱ्यांना म्हणने मी चांगला आहे.माझी निवड करा!आपण जीवनात स्वत:ला विकतच असतो. आपल्याकडची गोष्ट किंवा आपल मत इतरांना पटवून देणे हि विक्रीकलाच आहे.आपण काही विकतोय म्हणजे आपल्यात काही कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका.मी उत्पादन तयार केले आहे. मला वाटत ते उत्पादन वापरून लोकांचा फायदा होईल. हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांना कळविणे हे माझ काम आहे, हा विचार करा.तुम्हाला व्यवसायच वाढवायचा असेल, नवीन ग्राहक जोडायचे असतील, तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावेच लागेल
त्या प्रॉडक्ट्स बद्दल तुम्हाला किती माहिती आहे ? भविष्यात त्याची किती उपलब्धता असेल ? ते कोण विकत घेईल ? ते कुठे विकत मिळेल ? तुम्हाला जितकी जास्त माहिती तितकी तुमची बाजू मजबूत.वाढीसाठी कर्ज घेणे आवश्यक आहे.पण कर्ज किती घ्यावे ? ते कसे फेडणार ? हे तुम्हाला ठरवावं लागेल. सर्वात उत्तम हेच आहे कि, तुम्हाला होणारा नफा हा तुमच्या व्यवसायाच्या वाढीकरिता वापरावा. व्यवसाय वाढवण्यासाठी जास्त कर्ज घेणे धोकदायक आहे. त्यामुळे जास्त कर्जाच्या चक्रात सापडू शकता.
तुम्ही प्रॉडक्ट्स किती रूपयांना विकणार आहेत ?रॉ मटेरिअल किती रूपयांना विकत घेणार आहेत? यात तुमचा नफा किती ? ह्याच गणित करूनच व्यवसाय सुरु करा.अनेक लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो. काहीना तो चालवायचा असतो आणि फार कमी लोकांना तो टिकवायचा असतो.!व्यवसाय करणे म्हणजे शिकत राहणेमनात येणारे अनेक प्रश्न जे आता आहेत, व्यवसायातील प्रश्न, आव्हाने किंवा समस्या त्यातले काही मि शेअर करतोमला काहितरी करायचे आहे पण क़ाय करू समजत नाहीये?मला आता व्यवसाय की नोकरी है कन्फ्यूजन आहे,त्यातले क़ाय निवडू?
बिजनेस करण्यास माझ्याकड़े भांडवल नाही मग कसे?मग पार्टनर घेऊन करू का?घरातले वडिलधारे मंडळी नोकरी कर म्हणतात,मला व्यवसाय करायचा आहे व्यवसायात नेमके प्रोडक्ट्स किंवा फील्ड निवडू? कोणत्या बिजनेस मधे प्रॉफिट राहिल?कोणता तरी एक परफेक्ट व्यवसाय सूचवाल का? एखादी जबरदस्त आयडिया सांगाल का? माझे नॉलेज अनुभव कमी आहे?माझे शिक्षण कमी आहे?मला इंग्रजी येत नाही मला बोलने जमत नाही,त्यमुळे मि मार्केटला यशस्वी होइन का? मला व्यवसायिक मार्गदर्शन कुठे मिळेल का? मला मॉर्केटिंग मधे यश मिळेल का?
मि प्रोडक्ट सेल्स मधे यशस्वी होइल का? माझ्या सध्याच्या व्यवसायात वाढ कशी करू किंवा व्यवसाय फायदयात नाही? वाढ करण्यासाठी कोणत्या स्ट्रैटजी वापरू? 2वर्ष काम करून पहिले पण व्यवसाय फेल गेला आता पुढे क़ाय करू?मला मनी मैनेजमेंट जमले नाही किंवा पार्टनर ने धोका दिला, मार्केटमधे कॉम्पिटिशन वाढले आणि मला परवडत नव्हते म्हणुन व्यवसाय बन्द केला किंवा भाडयाने दिला सर्व काही व्यवस्थित सुरु आहे,पण व्यवसायत वाढ होत नाही क़ाय करू? गावाकडे तर व्यवसाय कोणता चालणार नाही कारण सगळा दुष्काळ आहे क़ाय करू?
गोविंद सुमन केशवराव डाके
अध्यक्ष
माळी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर
9922442376
Share your comments