नाशिक- नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरात अवघ्या दोन दिवसांत चार मुलींचे अपहरण (Four girls abducted) झाल्याने शहरा समवेतच संपूर्ण जिल्ह्यात खळखळ व्यक्त केली जात आहे. शहरात घडलेल्या या प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारी शिखरावर पोहोचल्याचे समजत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुलींची अपहरणाची बातमी समोर येत असल्याने शहरात अपहरण (Kidnapping) करणारी टोळी सक्रीय झाली असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे.
नाशिक शहरात केवळ दोनच दिवसात चार मुलींचे अपहरण झाली आहेत. या बाबत पालकांनी पोलिसांकडे (Nashik Police) तक्रारी देखील नोंदविल्या आहेत. शहरात वाढलेल्या या अपहरणाच्या कारणामुळे नाशिक शहरांतील पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. आधीच गुन्हेगारी वाढली असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातं आहे. आणि आता युवती बेपत्ता होत असल्यामुळे पोलिसांच्या डोकेदुखीत वाढच होणार आहे. पोलिसांच्या मते, अंबड परिसरात वास्तव्यास असलेल्या एका मुलीचे आमिष दाखवून अपहरण केले गेले आहे. तसा गुन्हा देखील अंबड पोलीस स्टेशनात पालकांद्वारे दाखल करण्यात आला आहे. यासारखीच घटना म्हसरूळ परिसरात देखील घडली आहे, म्हसरूळ मध्ये वास्तव्यास असलेल्या एका मुलीचे अज्ञात माणसाने आम्ही दाखवून अपहरण केले आहे. याबाबत मुलींच्या पालकांनी म्हसरूळ पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी घटना सातपूर परिसरात घडली आहे, सातपूर मध्ये मुलीचे नाहीतर मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. सातपूर मध्ये वास्तव्यास असलेले शंभू शरण केदार शर्मा यांचा मुलगा राजबाबू हा घरी क्रिकेट खेळायला जातो असे सांगून घराबाहेर पडला असता त्याचे अपहरण केल्याचे पालकांद्वारे सांगितले गेले तसेच याबाबत सातपूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रारही दाखल करण्यात आली आहे. काल देखील नाशिक शहरात दोन मुलींचे अपहरण झाल्याने संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पालक आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेसाठी काळजी करू लागले आहेत.
शहरात निर्भया पथक सारखे पथक कार्य करत असताना देखील घडत असणाऱ्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक सिद्ध होत आहे. तर यामुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व पालकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण बनले आहे. पोलीस या संदर्भात सखोल चौकशी करत असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी, या प्रकरणात लवकरात लवकर कार्यवाही करावी व शहरात सक्रिय असलेली अपहरण करणारी टोळी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गजाआड करावी अशी मागणी नागरिकांद्वारे पोलिसांकडे केली जात आहे.
Share your comments