1. बातम्या

पाचुपते यांच्यासह नागवडे गटाला धक्का; श्रीगोंदा तालुक्यासाठी पवारांनी आखली रणनीती..

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पण या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता.

पाराजी आबासाहेब शिंदे
पाराजी आबासाहेब शिंदे
Srigonda taluka

Srigonda taluka

अहमदनगर: नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला होता. पण या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला होता. परभाव पत्कारावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर आतापासूनच विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

पवार कुटुंबियांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव पाचपुते यांनी २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला. बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांना राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी धूळ चारली. आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे असे जगताप यांनी दाखवून दिले.

हेही वाचा: शिंदेचा ठाकरेंना मोठा धक्का; "राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीबाबत घेतला मोठा निर्णय"..

२०१९ च्या निवडणुकीत भाजपचे बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे घनशाम शेलार यांच्यात रंगत लढाई झाली. या लढाईत पाचपुते यांनी बाजी मारली. आणि राष्ट्रवादीचा गड असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. आता आमदार बबनराव पाचपुते यांना घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणनीती आखली आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो रस्त्यावरच्या लढ्यासाठी सज्ज राहा: राजू शेट्टी यांचा एल्गार

बाळासाहेब नहाटा आमदार पदाचे संभाव्य उमेदवार

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीगोंद्यात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे बाळासाहेब नहाटा यांच्याकडे आतापासूनच संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे.

पाचुपते यांच्यासह नागवडे गटालाही धक्का

बाजार समितीच्या राजकारणातून प्रविणकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा पुढे आले. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांची मदत घेतली. पवार यांनीही पुढील समीकरणे लक्षात घेत त्यांना साथ दिली.

नहाटा अधिकृतपणे पक्षात येण्यापूर्वीच त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील महासंघाचे सभापतीपदही देण्यात आले. त्यानंतर आता ते अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा पाचुपते यांच्यासह नागवडे गटालाही धक्का आहे.

पक्ष सोडलेल्या नेत्यांपैकी एक असल्याने पाचपुते यांच्यावर पवार कुटुंबियांचा रोष आहेच. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीकडून तयारी सुरू झाली आहे. या मतदारसंघात समन्वयाची जबाबदारी पूर्वीच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

हेही वाचा: मोठी घोषणा! शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार...
हेही वाचा: खवय्यांसाठी आनंदाची बातमी: आता वर्षभर कोकणच्या 'हापूस'ची चव चाखता येणार

English Summary: Shock to Nagwade group with Pacupate Pawar planned strategy Srigonda taluka Published on: 03 September 2022, 01:37 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters