1. बातम्या

शिवप्रभुंचा स्वाभिमान उफाळुन आला तो आग्रा पहिल्या रांगेत, आणि शिंदे साहेब शेवटी, साहेब वाईट वाटल..

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ यामध्ये आहे. मात्र यामध्ये एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले आहे. यावरून आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
amol mitkari eknath shinde

amol mitkari eknath shinde

राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये सर्व राज्याचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ यामध्ये आहे. मात्र यामध्ये एकनाथ शिंदे यांना शेवटच्या रांगेत स्थान देण्यात आले आहे. यावरून आता त्यांच्यावर टीका केली जात आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत एक ट्विट केले आहे, ते म्हणाले, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे निती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले आहेत. निती आयोगाच्या बैठकीनंतर झालेल्या फोटो सेशन वरुन राज्यात मोठे रणकंद झाले आहे. या फोटो सेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) केंद्र सरकारवर टीका केली आहे.

अखेर उद्या डिसले गुरुजी अमेरिकेत जाणार! अनेक घडामोडींमधून निघाला मार्ग..

या फोटोमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मध्यप्रदेचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे हे सर्वात मागे उभे आहेत. त्यावरुन आता जोरदार टीका होत आहे. यावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

सातबारा वरील जातीवाचक नावे हद्दपार! ठरावाला जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही या फोटोवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार ट्वीट करत म्हणाले, ''एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणे योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळे नक्कीच दुःख झालय. यापुढे असे होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!'' असे ट्विट केले आहे.

महत्वाच्या बातम्या;
गोमूत्र करणार शेतकऱ्यांना करोडपती! शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार..
महादेव जानकर भाजपची साथ सोडणार? जानकर म्हणाले...
दूध दरात एक रुपयाची वाढ, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

English Summary: Shivprabhu's self-respect rose Agra first row, Shinde Saheb end, Saheb felt bad.. Published on: 08 August 2022, 01:05 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters