मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेतून शिंदे गट (Shinde group) बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) राज्यामध्ये स्थापन झाले आहे. अजूनही शिवसेनेची (Shivsena) गळती सुरूच आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) बरोबर युती केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत केलेली युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची खोचक टीका शिवसेनेवर केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हे राज्यभर दौरे करत आहेत त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिंदे गटाने जसे सरकार स्थापन केले आहे तेव्हापासून खरी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तसेच ठाकरे गटाकडून शिवसेना आमचीच असल्याचा दावा वारंवार करण्यात येत आहे. शिवसेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा (Dasara Melava) घेण्यात येतो. मात्र गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे दसरा मेळावा झाला नाही.
नादच खुळा! 1.51 लाखाची बैल जोड; कामठीत बैलपोळा उत्साहात साजरा
मात्र आता यंदाही शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शिंदे गट का ठाकरे गट यंदा शिवसेना मेळावा घेणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले जे नियमात आहे तेच होईल, नियमाच्या बाहेर या सरकारमध्ये काहीच होणार नाही असे फडणवीस म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेसमध्ये लागलेल्या गळतीबद्दलही विचारण्यात आले तेव्हा फडणीसांनी काँग्रेसलाही खोचक टोला लगावला आहे. गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस म्हणाले, काँग्रेस पक्षाची स्थिती बुडत्या जहाजासारखी आहे, त्यामुळं अनेक लोकं पक्ष सोडून जात आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Buffalo Farming: आता वाहणार दुधाची गंगा! या 4 जातींच्या म्हशी देतायेत 600 ते 1300 लिटर दूध...
Gold Rate Today: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने स्वस्त! खरेदी करा 4532 रुपयांनी स्वस्त...
Share your comments