महाराष्ट्रात नुकतेच शिंदे फडणवीस युती यांची सत्ता स्थापन झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांनी मराठवाड्यातील पर्जन्यमान, पेरण्या तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व विभागांशी संवाद साधला होता. या भागातील शेतकऱ्यांची पावसाअभावी बिकट अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरूनही चिंता व्यक्त केली जात आहे.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास विभागात कोणती तयारी केली जावी याची माहितीही मुख्यमंत्र्यांना दिली होती.आता मात्र शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सत्तारूढ आमदारांच्या गोटातून धान खरेदीचे पुन्हा उद्दिष्ट वाढवून सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळण्याचेही संकेत मिळाले आहेत. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच पूर्व विदर्भातील धान उत्पादक सहा आमदारांनी सरकारकडे सामूहिक मागणी केली होती.
तुमच्याकडेही जास्त दूध देणारी जनावरे आहेत का? तर रहा अलर्ट, 'हा' आजार ठरू शकतो जीवघेणा
रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट्ये पूर्ण झाल्यामुळे धान खरेदी बंद करण्यात आली होती. केंद्र सरकार शेतकऱ्यांकडील धान आधारभूत किमतीनुसार खरेदी करण्याबाबतचे उद्दिष्ट ठरवत असते. यंदा हे उद्दिष्ट कमी देण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारने खरेदीची मर्यादा ठरवून दिली होती. धान उत्पादक भागातील सर्वपक्षीय आमदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातही यासंदर्भात पाठपुरावा केला होता.
महत्वाच्या बातम्या:
बकऱ्याने सगळी रेकॉर्डच तोडली, तर 'कॅप्टन' विकला सर्वात महाग, किंमत ऐकून डोळे होतील पांढरे
तुमच्यावर खरोखर प्रेम होते, आदित्य ठाकरे बोलताच त्या आमदाराने मानच खाली घातली, आणि...
Share your comments