सहकारात काही नियम असे आहेत की जे सहकारात मुरलेल्या नेत्यांच्या कामी येत आहेत. यामुळे आता राज्य सरकारने सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे, यासाठी काही निर्णय घेतले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निर्णयानुसार अक्रियाशील सदस्यांना निवडून येण्यास किंवा स्वीकृत म्हणून जाण्यास प्रतिबंध करण्याचा तसेच क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करण्याच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे अनेकांना दिलासा तर काहींना धक्का बसला आहे.
या निर्णयामुळे याचा परिणाम दिसणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा पहिला परिणाम इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून यादी बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील 25 हजार शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टर
अक्रियाशील सभासदांना मतदानाचा अधिकार ठेवल्याने संस्थांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याच्या मुद्द्यावरून काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत नव्याने निर्णय घेण्यात आला. याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती.
कोर्टात देखील याबाबत याचिका आहेत. ज्या सहकारी साखर कारखान्याची किंवा संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अंतिम मतदार यादी निश्चित झालेली आहे, अशा संस्था वगळून इतर संस्थांसाठी हा नवा निर्णय प्रतिबंधित राहणार आहे.
गुलाबी लसूण एक वरदान! खासियत आणि फायदे जाणून वाटेल आश्चर्य
क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून अक्रियाशील सदस्यांना निवडून येण्यास किंवा स्वीकृत म्हणून जाण्यास प्रतिबंध करण्याचा तसेच क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करण्याच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा काय परिणाम होणार का हे येणाऱ्या काळात समजेल.
राज्यातील ज्या सहकारी संस्थांमध्ये अक्रियाशील सभासद आहेत आणि त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानुसार मतदानाचा अधिकार मिळाला होता. तो अधिकार आता नव्या निर्णयानुसार शिंदे फडणवीस सरकारने काढून घेतला आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधीला दिला हिरवा कंदील, आता शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार..
शेतकऱ्यांनो कापूस वाणाची निवड करताना घ्या योग्य काळजी
भारतात सोन्याच्या माशांचा व्यवसाय ठरतोय फायदेशीर, एक लाख रुपये गुंतवून होतोय फायदा..
Share your comments